बल्लारपूर, चंद्रपूर रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी दहा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 12:11 PM2022-11-30T12:11:15+5:302022-11-30T12:14:48+5:30

सुधीर मुनगंटीवार : दोषींवर कारवाई पोलिस अहवालानुसारच

10 crores each for renovation of Ballarpur, Chandrapur railway station; Sudhir Mungantiwar, ballarpur railway bridge accident | बल्लारपूर, चंद्रपूर रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी दहा कोटी

बल्लारपूर, चंद्रपूर रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी दहा कोटी

googlenewsNext

चंद्रपूर : बल्लारपूर व चंद्रपूर या दोन्ही रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी दहा कोटी रुपये आणि वयोवृद्ध प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर सीएसआर फंडमधून बॅटरी ऑपरेटेड कार देण्यात येईल. या गाड्यांवर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांचे ‘क्युआर कोड’ विकसित करण्याची सूचना केली. स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या संख्येत वाढ करून ती ४० वरून ६० करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर रविवारी पादचारी पूल अचानक कोसळल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू, तर अनेक प्रवासी जखमी झाले. या घटनेच्या चौकशीसाठी पोलिस विभागामार्फत एफआयआर नोंदविण्यात आला असून, चौकशी अहवालानंतर दोषीवर कारवाई केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

घटनेच्या दिवशी रेल्वेस्थानकाला भेट दिल्यानंतर, सलग दुसऱ्या दिवशीही पालकमंत्र्यांनी बल्लारपूर रेल्वे स्टेशनला भेट देऊन रेल्वे प्रशासनाचा आढावा घेतला. स्टेशनवरील सध्याचे दोन्ही पूल तातडीने दुरुस्त करून घेण्याचे, तसेच नवीन पादचारी पुलाचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करून तेथे प्रवाशांसाठी लिफ्टची सुविधा सुरू करावी, असे त्यांनी निर्देश दिले.

आंध्र प्रदेशाकडून येणाऱ्या गाड्यांसाठी बल्लारपूर हे महाराष्ट्रातील पहिलेच महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून, या ठिकाणी रेल्वे पोलिस ठाणे सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. बल्लारपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या गाड्यांचे नियोजित प्लॅटफॉर्म वेळेवर बदलत असल्याबाबत प्रवाशांची तक्रार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांकाबाबत वेळेवर घोषणा होत असल्याने नागरिकांची धावपळ होते. ते त्यांच्या जिवावरही बेतू शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व येणाऱ्या गाडीचा प्लॅटफार्म निश्चित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. याप्रसंगी रेल्वे प्रशासनातर्फे गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये व किरकोळ दुखापतग्रस्तांना ५० हजार रुपये रोख अदा करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, रेल्वे प्रशासनच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, नॅशनल रेल्वे यूजर्स कौन्सिलचे सदस्य अजय दुबे, लोहमार्ग पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक कृष्णा पाटील, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, बल्लारपूर स्टेशन प्रबंधक ए. यू. खान उपस्थित होते.

केंद्रीय मंत्र्यांकडून दखल : धानोरकर

चंद्रपूर आणि बल्लारशा रेल्वेस्थानकांचे सौंदर्यीकरण झाले. मात्र मजबुतीकरण झालेले नाही, असे या घटनेवरून दिसून येते. त्यामुळे रेल्वे ओव्हरब्रिजचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन दोन अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे

Web Title: 10 crores each for renovation of Ballarpur, Chandrapur railway station; Sudhir Mungantiwar, ballarpur railway bridge accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.