१० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम कासवगतीने

By admin | Published: April 19, 2017 12:44 AM2017-04-19T00:44:39+5:302017-04-19T00:44:39+5:30

औद्योगिक शहर गडचांदूरला मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी मिळावे,....

10 crores of water supply scheme | १० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम कासवगतीने

१० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम कासवगतीने

Next

पाच वर्षांपासून सुरू आहे काम : गडचांदूरकरांना अतिरिक्त पाण्यासाठी प्रतीक्षा
गडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूरला मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नातून अंमलनाला धरणावरून गडचांदूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला २० नोव्हेंबर २०१७ ला मंजुरी मिळाली. १० करोड ३५ लाख ४२ हजार रुपयाच्या योजनेला १२ जानेवारी २०१२ ला सुरुवात झाली.
सदर योजना ११ जानेवारी २०१४ पर्यंत पूर्ण करुन नगर परिषदेला हस्तांतरीत करावयाची होती. मात्र प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे योजनेचे काम कासवगतीने सुरु आहे. पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी काही कामे अद्याप अपूर्ण असल्याने अतिरीक्त पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.
गडचांदूर वाढीव पाणी पुरवठा योजनेवर आतापर्यंत सात कोटी ६८ लाख २९ हजार रुपये खर्च झाले आहे. अंमलनाला धरणातील इंटेक वेल, इन्स्पेक्शन वेल, कनेक्टीव वेल, जॅक वेल, पंप हाऊस, अप्रोच ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे.
अशुद्ध पाणी पंपीग मशीनरी व उर्ध्ववाहीनीचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून चाचणी बाकी आहे. ब्रेक प्रेशर टँकचे काम पूर्ण झाले आहे. अशुद्ध पाणी गुरुत्वनलीकाचे काम ८५ टक्के झाले असून चाचणी बाकी आहे. गडचांदूर शहरातील साईशांतीनगर येथे पाण्याच्या उंच टाकीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम ५० टक्के झाले असून चाचणी बाकी आहे. शुद्ध पाणी पंपीग मशीनरी ३० एचपी व पाच एचपी पंपाचा पुरवठा अद्याप पर्यंत झाला नाही. शुद्ध पाणी उर्ध्व नलीकाचे काम ४० टक्के झाले आहे. वितरण व्यवस्थेचे काम ६४ टक्के झाले आहे. आरसीसी पंप स्लब डिस्पोजल कवेक्शन, पंपीग मशीनरी स्लज पाईप लाईन स्लजच्या कामाला सुरुवातच झाली नाही. सर्वेक्षण भिंत, ट्रायल रन यासारख्या किरकोळ कामाला सुरुवातच झाली नाही.
कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे. (वार्ताहर)

येत्या सहा महिन्यात पाणीपुरवठा योजना पूर्ण करुन नगर परिषदेला हस्तांतरण केली जाईल. दिलेल्या मुदतीत संबंधीत ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यामुळे ठेकेदारावर चार हजार रुपये प्रती दिवस दंड ठोठावला आहे.
- के. एन. शेख , शाखा अभियंता गडचांदूर

नगर परिषदेने प्राधिकरणाला वारंवार पत्र देऊन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यास सूचविले आहे. पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर ती चांगली योग्य असल्याची खात्री झाल्याशिवाय न.प. हस्तांतर करुन घेणार नाही.
- संजय जाधव, मुख्याधिकारी न.प. गडचांदूर

पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे
शहरात टाकलेले पाईपलाईनचे काम निकृष्ठ दर्जाचे असून पाणीपुरवठा केल्यानंतर किती दिवस टिकेल, याची शंका आहे.
- सचिन भोयर, उपाध्यक्ष न.प. गडचांदूर

Web Title: 10 crores of water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.