एटापल्लीत १० हातपंप मंजूर

By admin | Published: May 7, 2017 12:35 AM2017-05-07T00:35:33+5:302017-05-07T00:35:33+5:30

एटापल्ली नगर पंचायत क्षेत्रात दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण व्हायची. नागरिकांना दुसरीकडून पाणी आणावे लागत होते.

10 handpumps approved at Atapally | एटापल्लीत १० हातपंप मंजूर

एटापल्लीत १० हातपंप मंजूर

Next

उद्घाटन : नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली नगर पंचायत क्षेत्रात दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण व्हायची. नागरिकांना दुसरीकडून पाणी आणावे लागत होते. शहरातील ही समस्या लक्षात घेऊन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या स्थानिक आमदार निधीतून दहा हातपंप मंजूर करण्यात आले आहेत. सदर हातपंपाचे उद्घाटन जि. प. सदस्य कल्पना आत्राम यांच्या हस्ते झाले.
एटापल्ली नगर पंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची समस्या उन्हाळ्यात निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू नये, याकरिता पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या स्थानिक निधीतून नगर पंचायत क्षेत्रासाठी दहा हातपंप मंजूर करण्यात आले. त्यानंतर हातपंपाचे उद्घाटने जि. प. सदस्य कल्पना आत्राम यांच्या हस्ते झाले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नवीन बाला, नगर पंचायतीचे गटनेता दीपक सोनटक्के, पं. स. सदस्य जनार्धन नल्लावार, नगरसेवक विजय नल्लावार, भाजपचे तालुका महामंत्री प्रशांत आत्राम, नगरसेविका सुनीता चांदेकर, नगरसेवक रमेश मट्टामी, संदीप दंडीकवार, सचिन मोतकुरवार, राहूल मेश्राम व शहराती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: 10 handpumps approved at Atapally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.