चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याने घेतला १० वर्षाच्या मुलाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:19 PM2020-10-01T17:19:34+5:302020-10-01T17:19:57+5:30
Leopard Attack, Chandrapur News ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी जवळील वांद्रा येथील एका दहा वर्षाच्या मुलाचा गुरुवारी बिबट्याने बळी घेतला. ही घटना गुरुवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत क्षेत्र सहाय्यक कार्यालय मेंडकीमधील चिचगाव बिटात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी जवळील वांद्रा येथील एका दहा वर्षाच्या मुलाचा गुरुवारी बिबट्याने बळी घेतला. ही घटना गुरुवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत क्षेत्र सहाय्यक कार्यालय मेंडकीमधील चिचगाव बिटात घडली. नैतिक संतोष कुथे असे मृतक मुलाचे नाव आहे.
नैतिक हा नेहमीप्रमाणे चिचगाव परिसरात पहाटे व्यायाम करण्यासाठी जात होता. दरम्यान, त्याच बिटात दबा धरून बसलेल्या बिबट्याने नैतिकवर हल्ला चढविला. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ब्राम्हे या आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचल्या. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरिता ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या भागातील वाघांचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी चिचगाव, वांद्रा येथील नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीदेखील या भागात लहान मुलांवर वाघाचे कित्येकदा हल्ले झाले आहेत. यात काहींचा बळी तर काही मुले जखमी देखील झाले आहेत. या भागात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडपी जंगल असल्यामुळे येथे बिबट, वाघ या हिंस्र प्राण्यांचा वावर आहे.