१०० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:23+5:302021-05-10T04:28:23+5:30
चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपये तसेच उद्योगांच्या सामजिक दायित्व निधीतून वन अकादमी ...
चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपये तसेच उद्योगांच्या सामजिक दायित्व निधीतून वन अकादमी येथे साकारण्यात आलेले ११५ खाटांचे कोविड रुग्णालय सोमवारपासून रुग्णांना सेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे. यामध्ये ११ बेड ऑक्सिजनयुक्त राहणार आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांनी रविवारी या रुग्णालयाच्या कामाची पाहाणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, अशा सूचना केली. यावेळी नोडल ऑफिसर रोहन घुगे, बांधकाम विभागाचे अभियंता रोठोड यांच्यासह माजी नगरसेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
येथे ११५ खाटा असून यातील १०० खाटा ऑक्सिजनयुक्त आहेत. यावेळी त्यांनी कोविड रुग्णांकरिता कमी वेळेत सोयीसुविधायुक्त रुग्णालय तयार केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले तसेच पालकामंत्र्यांनीही रुग्णालयासाठी प्रशासकीय मान्यता दिली, त्यामुळेच रुग्णालय वेळेत सुरू होत असल्याचे जोरगेवार यांनी सांगितले.