मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे १०० टक्के निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:42 AM2020-12-16T04:42:44+5:302020-12-16T04:42:44+5:30
चंद्रपूर : ‘सर्वांसाठी घरे-२०२०’ या अभियान कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम ...
चंद्रपूर : ‘सर्वांसाठी घरे-२०२०’ या अभियान कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम आवास, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करावी, अशा सूचना देतानाच मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे १०० टक्के निधी देणार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.
आवास अभियान ग्रामीण अंतर्गत नुकतेच जिल्हास्तरीय कायशाळेत ते बोलत होते.
यावेळी प्रकल्प संचालक शंकर किरवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रणव बक्षी, जिल्हास्तरीय प्रोग्रामर दिपाली जवळे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी महाआवास अभियान ग्रामीण २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या १०० दिवसांच्या कालावधीत विभागात राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व अपेक्षित उद्दिष्टपूर्तीसाठी ही कार्यशाळा झाली. अभियान अंतर्गत गरजू व पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे, घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत कुशल गवंडी तयार करणे, पंचायत समितीनिहाय डेमो हॅाऊसेस उभारणे, घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्यांचे १०० टक्के वितरण करणे. घरकुलांच्या उद्दिष्टानुसार १०० टक्के घरकुल भौतिकदृष्ट्या पूर्ण, सर्व घरकुलधारकांना भौतिक प्रगतीनुसार सर्व हप्ते प्रदान करुन घरकुले आर्थिकदृष्टया पूर्ण करणे व कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सिडींग तसेच जॉबकार्ड मॅपिंगसह राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत चर्चा झाली.