राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून पाठविले एक हजार वर्षे टिकणारे सागवान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:11 AM2023-03-30T11:11:10+5:302023-03-30T11:11:17+5:30

देशातील सर्वोत्कृष्ट लाकडापासून बनणार प्रभू श्रीरामाच्या गर्भगृहाचे महाद्वार

1000 year teak sent from Maharashtra for Ram temple | राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून पाठविले एक हजार वर्षे टिकणारे सागवान

राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून पाठविले एक हजार वर्षे टिकणारे सागवान

googlenewsNext

चंद्रपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील जगप्रसिद्ध सागवान लाकडाची निवड करण्यात आली असून, एक हजार ८५४ घनफूट लाकडाची पहिली खेप बुधवारी अयोध्येला पाठविण्यात आली आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचाही प्रभाव न होता एक हजार वर्षे टिकणाऱ्या या लाकडाला जगभरातील सर्वोत्कृष्ट सागवान म्हणून ओळखले जाते. 

ब्रिटिशकाळापासून या लाकडाला मागणी असून, दिल्लीतील नवे संसदभवन सेंट्रल विस्टासाठीही हे लाकूड वापरले आहे. बल्लारपुरात पूजन, शोभायात्रेच्या माध्यमातून एक कोटी ३१ लाख रुपये किमतीचे सागवान अयोध्येकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी, उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय, बनारसचे पालकमंत्री रवींद्र जायस्वाल व वन पर्यावरण राज्यमंत्री डाॅ. अरुणकुमार सक्सेना, हिंदी आणि मराठीतील प्रसिद्ध कलाकार, गायक उपस्थित होते. यावेळी ४३ प्रकारच्या लोककलांचे सादरीकरण झाले. 

चंद्रपूरचेच सागवान का?
अभ्यासक आणि चाचण्यांच्या आधारे देशात सर्वोत्कृष्ट सागवान चंद्रपुरातील जंगलात या लाकडाला उधळी किंवा कीड लागत नाही. पाण्याने लाकूड खराब होत नाही. एक हजार वर्षे हे लाकूड टिकून राहू शकते.

लाकडांचा पुढील प्रवास
बल्लारपुरातून पुढे नागपूरला लाकडांवर प्रक्रिया करून त्यातील पाणी बाहेर काढले जाईल. पुढे हैदराबाद किंवा गुजरातमध्ये त्यावर नक्षीकाम होईल. नंतर हे लाकूड अयोध्येला नेले जाईल. 

लाकडापासून काय करणार?
राममंदिराचा गाभारा, गर्भगृहाचे महाद्वार, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे. 

Web Title: 1000 year teak sent from Maharashtra for Ram temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.