चंद्रपूर जिल्ह्यातील १०२ शिक्षक झाले कार्यमुक्त; बदल्यांमध्ये शिक्षकांची नागपूर जिल्ह्याला पसंती

By साईनाथ कुचनकार | Published: August 30, 2022 05:26 PM2022-08-30T17:26:26+5:302022-08-30T17:27:03+5:30

जिल्ह्यातील १७१ शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले होते. यातील १०२ शिक्षकांची बदली झाली

102 teachers of Chandrapur district have been transferred | चंद्रपूर जिल्ह्यातील १०२ शिक्षक झाले कार्यमुक्त; बदल्यांमध्ये शिक्षकांची नागपूर जिल्ह्याला पसंती

चंद्रपूर जिल्ह्यातील १०२ शिक्षक झाले कार्यमुक्त; बदल्यांमध्ये शिक्षकांची नागपूर जिल्ह्याला पसंती

googlenewsNext

चंद्रपूर : प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी ग्रामविकास विभागाने आदेश काढल्यानंतर जिल्ह्यातील १७१ शिक्षकांनीबदलीसाठी अर्ज केले होते. यातील १०२ शिक्षकांची बदली झाली असून त्यांना जिल्ह्यातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. दरम्यान शासनाने आदेश काढल्यानंतर नियमाप्रमाणे कागदपत्र पूर्ण केलेल्या तसेच संवर्गनिहाय रिक्त असलेल्या जागेवर १०२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. 

या बदल्यांमध्ये शिक्षकांनी नागपूर जिल्ह्याला पसंती दिली असून चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वाधिक शिक्षक नागपूर येथे बदली होऊन गेले आहे. विशेष म्हणजे, भंडारा, अमरावती, सोलापूर येथेही काही शिक्षक बदली होऊन गेले आहे.

Web Title: 102 teachers of Chandrapur district have been transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.