११२६ कोरोनामुक्त, २१ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:27 AM2021-05-16T04:27:40+5:302021-05-16T04:27:40+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७६ हजार ९०१ झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ६४ हजार ९४४ झाली ...
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७६ हजार ९०१ झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ६४ हजार ९४४ झाली आहे. सध्या १० हजार ७२५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ३१ हजार २८७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ५१ हजार ३८८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२३२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ११४०, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३५, यवतमाळ ३९, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत: व कुटुंबाची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधाची लस घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृत
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील ४१ व ७३ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, बालाजी वार्ड येथील ७४ व ८२ वर्षीय पुरुष, भानापेठ वार्ड येथील ६८ वर्षीय महिला, बाबूपेठ येथील ४० वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, नगीनाबाग येथील ५४ वर्षीय पुरुष, शक्तीनगर येथील ५७ वर्षीय पुरुष, जलनगर येथील ७५ वर्षीय महिला, दाताळा येथील ३८ वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील उज्ज्वल नगर येथील ५४ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्ड येथील ७३ वर्षीय पुरुष, कोठारी येथील ६८ वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथील ७० वर्षीय महिला. राजुरा तालुक्यातील मार्डा येथील ६३ वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील वडाळा पैकू येथील ६५ वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील वडगाव येथील ५२ वर्षीय पुरुष, तर वणी-यवतमाळ येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह
चंद्रपूर मनपा क्षेत्र २५०
चंद्रपूर तालुका ८२
बल्लारपूर ६६
भद्रावती ४५
ब्रह्मपुरी ३७
नागभीड ३४
सिंदेवाही ३९
मूल ११९
सावली ५३
पोंभुर्णा १६
गोंडपिपरी २८
राजुरा ५८
चिमुर ११
वरोरा ८५
कोरपना ७३
जिवती ११
अन्य ०९