वाहनधारकांकडून वसूल केला १.१४ कोटींचा दंड

By admin | Published: November 23, 2014 11:15 PM2014-11-23T23:15:16+5:302014-11-23T23:15:16+5:30

वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे,

1.14 crores of fine collected from the drivers | वाहनधारकांकडून वसूल केला १.१४ कोटींचा दंड

वाहनधारकांकडून वसूल केला १.१४ कोटींचा दंड

Next

पोलिसांची कामगिरी : ४८ हजार ४३५ वाहनधारकांवर कारवाई
चंद्रपूर : वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, त्यांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाने चालू वर्षामध्ये विविध मोहीम राबवून वाहनधारकांना नियमांची ओळख करून दिली आहे. एवढेच नाही तर, ज्यांनी नियम तोडले त्यांच्याकडून मागील १० महिन्यांमध्ये तब्बल १ कोटी १४ लाख रुपये दंड वसुल केला आहे.
चंद्रपूर शहराचा विचार केल्यास मागील १० महिन्यांत २८ हजार ५३० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ३३ लाख ५३ हजार ५० रुपयांचा दंड वसुल केला आहे. यात सर्वाधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. सर्वाधिक दंड वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या तथा पीयुसी नसलेल्या वाहनधारकांकडून वसुल केला गेला आहे. चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. वाहतूक विभागाने ३०२ वाहनांवर कारवाई करीत २ लाख ९६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. तर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ५ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ९० हजार ३५० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
ग्रामीण क्षेत्रातही वाहनधारक पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करीत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. काही वाहनधारकांवर ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमार्फत कारवाई करण्यात आली. मागील १० महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये १९ हजार ८९६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६७ लाख १४ हजार १३० रुपये वसूल करण्यात आले आहे. यात १७ हजार ३२३ वाहनधारकांकडून २२ लाख २९ हजार ९५० रुपये, ६७३ ओव्हरलोड वाहनधारकांकडून २५ लाख ९७ हजार ७८० रुपये तसेच अवैध यात्रा परिवहन करणाऱ्या १ हजार ९०० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १८ लाख ८६ हजार ४०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
दंड वसुल केला असला तरी वाहनधारक वाहतूक नियमानुसार वाहन वाचविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.(नगर प्रतिनिधी)

Web Title: 1.14 crores of fine collected from the drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.