१,१७१ नवे पॉझिटिव्ह, १६ बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:28 AM2021-04-16T04:28:45+5:302021-04-16T04:28:45+5:30
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ३७ हजार ९१९ वर पोहोचली आहे. सध्या ८,२१२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख ...
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ३७ हजार ९१९ वर पोहोचली आहे. सध्या ८,२१२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख १६ हजार ११९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ लाख ७२ हजार ६६० नमुने निगेटिव्ह आले आहेत. गुरूवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील भिवापूर वॉर्ड येथील ६३ वर्षीय महिला, दुर्गापूर येथील ६२ वर्षीय महिला, घुटकाळा येथील ६० वर्षीय पुरूष, जवाहरनगर वार्ड राजुरा येथील ५७ वर्षीय महिला, चिमूर येथील ६५ वर्षीय, ६३ वर्षीय व ७० वर्षीय महिला, गोरेगाव जिल्हा गोंदिया येथील ६० वर्षीय महिला, वरोरा येथील ७० वर्षीय महिला, राजुरा येथील ३९ वर्षीय पुरूष, बोरगाव, कोरपना येथील ६२ वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील गोवारी येथील ६५ वर्षीय पुरूष, मोर्शी नागभीड येथील ७४ वर्षीय पुरूष, सिंदेवाही येथील ५३ वर्षीय पुरूष, यात्रा वार्ड वरोरा येथील ८५ वर्षीय पुरूष व बल्लारपूर येथील ५० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५४५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ४९८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २१, यवतमाळ २०, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधित
चंद्रपूर मनपा ४३२
चंद्रपूर तालुका ६०
बल्लारपूर १५
भद्रावती ७९
ब्रह्मपुरी ७२
नागभीड २६
सिंदेवाही ३२
मूल २२
सावली ०७
गोंडपिपरी ०९
राजूरा ४४
चिमूर १२५
वरोरा १४७
कोरपना ८०
जिवती ०७
इतर १४