राजुरा तालुक्यातील १२ सहकारी संस्था ४ कोटींनी तोट्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:12 IST2025-04-04T16:11:48+5:302025-04-04T16:12:35+5:30
Chandrapur : केवळ सहा संस्थांना मिळाला नफा

12 cooperative societies in Rajura taluka suffer losses of Rs 4 crore
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : राजुरा तालुक्यातील १२ सहकारी संस्थेला ४ कोटी ३९ लाख २२ हजार ९५० रुपयांचा तोटा बसला असून केवळ सहा संस्था नफ्यात आहेत.
राजुरा तालुक्यातील सेवा सहकारी आणि आदिवासी सहकारी संस्था मिळून अठरा संस्थेवर ६० कोटी ८७लाख २६ हजार २३४ रुपये कर्ज आहे. राजुरा तालुक्यात पाच आदिवासी सेवा सहकारी संस्था असून सर्व संस्था तोट्यात आहेत.
देवाडा १ कोटी ८३३ रुपयांचा तोटा आहे. तरुर रोड येथील संस्था ७० लाख ७८ हजार ९३२ रुपयांनी तोट्यात आहे. चिंचोली बु. १७ लाख ५७ हजार ३७७, भेंडवी- १ करोड ५५ लाख ८९ हजार ६६८ रु. तोटा झाला आहे. हरदोना संस्थेला ९४ हजार ४८६ रुपये तोटा आहे. सेवा सहकारी संस्थेचे १३ मधून कोलगाव, गोवरी, चिंचोली खु, चार्ली, साखरी कढोली बू या सहा संस्था नफ्यात आहेत.
सुमठाणा येथील संस्था ९ लाख ३८ हजार ६३८ रुपये तोट्यात आहे. धोपटाला ५ लाख ४८ हजार ५९० रुपये तोटा, राजुरा सेवा सहकारी संस्था १९ लाख ४४ हजार ८७२, चुनाळा- १३ लाख ८३ हजार ४५८ रुपये तोटा, विहीरगाव-२८ लाख ४३ हजार ८०६, मारडा १२ लाख ७३ हजार ७८७ रु. तोटा, सास्ती ४ लाख ७७ हजार ५०३ रुपये तोटा झाला आहे. राजुरा तालुक्यात अनेक संस्था तोट्यात आहेत. या संस्था तोट्यात का जात आहे याची चौकशी करणे गरजेचे आहे. राजुरा तालुक्यातील १७ संस्था 'क' वर्गात असून केवळ एक संस्था 'ब' वर्गात आहे.