१२ लाख ७ हजार ६१८ जणांनी घेतला कोरोनाविरुद्ध डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:33 AM2021-09-14T04:33:21+5:302021-09-14T04:33:21+5:30
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला लसींचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने तसेच ...
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला लसींचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने तसेच नागरिकांत संभ्रम असल्याने लसीकरणाची गती संथ होती. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा टास्क फोर्सच्या नियमित बैठका घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याने निराशेचे चित्र पालटले. १ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत २६८ केंद्रांवर ५ लाख ३३ हजार ३२३ जणांना लस देण्यात आली. यात सर्वाधिक लसीकरण ४ सप्टेंबर रोजी ४५ हजार ६९९ नागरिक, ९ सप्टेंबर रोजी ४५ हजार ४४० तसेच ११ सप्टेंबरला ४४ हजार २६३ जणांना, ३१ ऑगस्टला ४३ हजार ७०४ आणि २३ ऑगस्ट २०२१ रोजी ३९ हजार ७२० जणांचे लसीकरण पूर्ण होऊ शकले.
बॉक्स
२ लाख ७२ हजार नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण
लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या १६ लाख ४१ हजार ८३० नागरिकांमध्ये १८ ते ४४ वयोगटात ९ लाख ६८ हजार ९४८, ४५ ते ६० वयोगटातील ४ लाख ४८ हजार ५८६ तर ६० वर्षांवरील २ लाख २४ हजार २९६ नागरिकांचा समावेश आहे. ९ लाख ३५ हजार ५१ जणांनी पहिला तर २ लाख ७२ हजार ५६७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.