चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे १२ महिलांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:29 AM2017-11-08T00:29:06+5:302017-11-08T00:29:17+5:30
तालुक्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आॅक्टोबर २०१७ मध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले होते. मात्र यावेळी चुकीच्या पद्धतीने महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तालुक्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आॅक्टोबर २०१७ मध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले होते. मात्र यावेळी चुकीच्या पद्धतीने महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली. परिणामी वरोरा उपजिल्हा रूग्णालय शस्त्रक्रिया केलेल्या १२ महिलांना बाधा झाली. परिणामी महिलांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे सदर प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हा चिकित्सकाला देण्यात आले.
शासनातर्फे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये अनेकांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. मात्र चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे अनेक महिलांना बाधा झाली. त्यात वरोरा तालुक्यातील सरीता पिदूरकर, सरीता रामलाल धाडसे, सारिका सुनील सहारे या तीन महिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्या तीनही महिला मागील एक महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी त्याची भेट घेतली असता, सरकारी दवाखाण्यात वापरण्यात आलेले सुत आणि शस्त्र निकृष्ठ दर्जाचे आहेत. तसेच औषधीचा अभाव असल्याने रूग्णाची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर प्रकाराची चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देणाºया शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नंदा अल्लूरवार, अनिता कथडे, प्रकाश देवतळे, अनिल मत्ते, अविनाश धोंडरे आदी उपस्थित होते.