खड्ड्यात फसलेला १२ वर्षीय बालक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:24 PM2018-08-03T22:24:04+5:302018-08-03T22:25:05+5:30
रात्री ९ वाजताची वेऴ एक १२ वर्षांचा मुलगा आपल्याच आनंदात रस्त्याने जात होता़ दरम्यान अचानक खड्ड्यात पडल्याने त्यातील चिखलात फसला़ याच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना हे दृश्य दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या बालकाला सुरक्षित बाहेर काढून माणुसकीचा प्रत्यय दिला़ ही घटना येथील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाजवळ रात्री ९ वाजता घडली़ प्रित पाटील असे त्या बालकाचे नाव आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रात्री ९ वाजताची वेऴ एक १२ वर्षांचा मुलगा आपल्याच आनंदात रस्त्याने जात होता़ दरम्यान अचानक खड्ड्यात पडल्याने त्यातील चिखलात फसला़ याच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना हे दृश्य दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या बालकाला सुरक्षित बाहेर काढून माणुसकीचा प्रत्यय दिला़ ही घटना येथील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाजवळ रात्री ९ वाजता घडली़ प्रित पाटील असे त्या बालकाचे नाव आहे़
शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे काम सध्या सुरू आहे. कंत्राटदाराने पिल्लरसाठी खड्डे खोदले़ मात्र या खड्ड्यांभोवती सुरक्षेकरिता कठडे लावले नाही. दिशादर्शक फलक व पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्थादेखील नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करून न दिल्याने नाइलाजास्तव नागरिकांना खड्ड्याच्या काठाने ये-जा करावी लागते.
अशातच गुरूवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रित पाटील हा १२ वर्षीय बालक रस्त्याने जात होता. तेव्हा त्याला खड्ड्याचा अंदाज न आल्याने पिल्लरच्या खड्ड्यात पडला. खड्ड्यात मातीयुक्त चिखल असल्याने प्रित पाटील हा थेट मानेपर्यंत फसला़ ही घटना नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्याने प्रसंगावधान दाखवून बालकाला सुखरूप बाहेर काढले़ कंत्राटदाराच्या चुकीमुळेच ही घटना घडली़ सात दिवसांच्या आत फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक स्नेहल रामटेके यांनी दिला आहे.