१२२ दिव्यांगांना मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 10:39 PM2018-12-05T22:39:26+5:302018-12-05T22:39:42+5:30
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार जि. प. समाजकल्याण विभागाच्या वतीने बल्लारपूर येथील नगरपरिषद, बचत भवन, भवनात आयोजित कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये ४७ तीन चाकी सायकल, दोन पांढरी अंधकाठी, १५ व्हिलचेअर, १२ साधी काठी, १४ कुबड्या, २२ श्रवणयंत्र, आठ एम. आर.किट, दोन रोलेटर वितरीत केले. त्यामुळे १२२ दिव्यांग लाभार्थ्यांना आधार मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार जि. प. समाजकल्याण विभागाच्या वतीने बल्लारपूर येथील नगरपरिषद, बचत भवन, भवनात आयोजित कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये ४७ तीन चाकी सायकल, दोन पांढरी अंधकाठी, १५ व्हिलचेअर, १२ साधी काठी, १४ कुबड्या, २२ श्रवणयंत्र, आठ एम. आर.किट, दोन रोलेटर वितरीत केले. त्यामुळे १२२ दिव्यांग लाभार्थ्यांना आधार मिळाला आहे.
कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, नगर परिषद उपाध्यक्ष चौधरी, सभापती येल्लयादास सराफ आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जि. प. अध्यक्ष भोंगळे म्हणाले, समाजातील दिव्यांगांची मदत ही सामाजिक भावनेतून झाली पाहिजे, या मदतीमध्ये कृतज्ञता, विनम्रता आणि मदतीची सामाजिक भावना असावी, तसेच दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलवावा, असे आवाहन त्यांनी केले. तर बँक आॅफ इंडियाचे घरोटे व उद्योग केंद्राचे चव्हाण यांनी दिव्यांगांकरिता प्रशिक्षण व बँकलोनबाबत मार्गदर्शन केले. संचालन गट विकास अधिकारी धनंजय साळवे, प्रास्ताविक सुनील जाधव यांनी केले.