२४ तासात १२२ पॉझिटिव्ह तर दोन बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 05:00 AM2021-06-12T05:00:00+5:302021-06-12T05:00:29+5:30
बाधित आलेल्या १२२ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २३, चंद्रपूर तालुका ०२, बल्लारपूर ७, भद्रावती १०, ब्रम्हपुरी १२ , नागभिड १२, सिंदेवाही ४, मूल ४, सावली ४, पोंभुर्णा २, गोंडपिपरी ४, राजुरा २, चिमूर ७, वरोरा १४, कोरपना १, जिवती शुन्य व इतर ठिकाणच्या १४ रुग्णांचा समावेश आहे. मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील साळवे कॉलनी परीसरातील ३९ वर्षीय महिला तर पोभुंर्णा तालुक्यातील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी दहशत मात्र कायम आहे. दरम्यान, गुरुवारी शंभरीच्या आत असलेली रुग्णसंख्या शुक्रवारी १२२ वर गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
मागील २४ तासात जिल्ह्यात १७१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर १२२ जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, दोघांचा मृत्यू झाला आहे.
बाधित आलेल्या १२२ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २३, चंद्रपूर तालुका ०२, बल्लारपूर ७, भद्रावती १०, ब्रम्हपुरी १२ , नागभिड १२, सिंदेवाही ४, मूल ४, सावली ४, पोंभुर्णा २, गोंडपिपरी ४, राजुरा २, चिमूर ७, वरोरा १४, कोरपना १, जिवती शुन्य व इतर ठिकाणच्या १४ रुग्णांचा समावेश आहे. मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील साळवे कॉलनी परीसरातील ३९ वर्षीय महिला तर पोभुंर्णा तालुक्यातील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ८७ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८१ हजार ४६७ झाली आहे. सध्या १ हजार १२८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख १० हजार ६०५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख २३ हजार ११३ नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४९२ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३८१, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ४०, यवतमाळ ५१, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.