१२३ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 05:00 AM2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:01:13+5:30

जिल्हा ग्रीन झोन मध्ये असला तरी एक रुग्ण जिल्ह्याला धोक्यात आणू शकतो. त्यामुळे कोणताही धोका पत्करू नका. घरातील एकाच सुदृढ नागरिकांनी बाहेर पडून जीवनावश्यक वस्तू घरी घेऊन जाव्यात. केशरी शिधापत्रिकाधारकांना २४ एप्रिलपासून मे महिन्याचे धान्य वाटप होत आहे. प्रतिव्यक्ती आठ रुपये दराने तीन किलो गहू व प्रतिव्यक्ती १२ रुपये दराने दोन किलो तांदूळ वितरित केल्या जाणार आहे.

123 in Institutional Quarantine | १२३ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये

१२३ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्दे७८ पैकी ७७ नमुने निगेटिव्ह : २४ एप्रिलपासून केशरी शिधापत्रिकाधारकांनाही धान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला १४ दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाइनला (इन्स्टिट्यूशनल) ठेवणे सुरू केले आहे. जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. ७८ पैकी ७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. १२३ लोकांना सध्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात गरीब निराश्रित यांच्या अन्नधान्य पुरवठासोबतच २४ एप्रिलपासून केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांनादेखील अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडीओ संदेशद्वारा बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी संपर्क साधला आहे. रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहने आणू नका. पुढील ३ मेपर्यंत लॉकडाऊन काटेकोरपणे पाळा आणि प्रशासनाचे कान डोळे होत बाहेरून येणाºया प्रत्येक नागरिकाची माहिती द्या, असे आवाहन त्यांनी आजच्या ताज्या व्हिडिओमध्ये केले आहे.
जिल्हा ग्रीन झोन मध्ये असला तरी एक रुग्ण जिल्ह्याला धोक्यात आणू शकतो. त्यामुळे कोणताही धोका पत्करू नका. घरातील एकाच सुदृढ नागरिकांनी बाहेर पडून जीवनावश्यक वस्तू घरी घेऊन जाव्यात. केशरी शिधापत्रिकाधारकांना २४ एप्रिलपासून मे महिन्याचे धान्य वाटप होत आहे. प्रतिव्यक्ती आठ रुपये दराने तीन किलो गहू व प्रतिव्यक्ती १२ रुपये दराने दोन किलो तांदूळ वितरित केल्या जाणार आहे.

मोबाईल रिचार्जची दुकाने उघडणार
प्रिपेड मोबाईलधारकांना संपर्कामध्ये बाधा येऊ नये, यासाठी केंद्र सरकारच्या निर्णयानुसार मोबाईल रिचार्ज प्रतिष्ठाने सुरू करण्यात येत आहे. सोबतच हार्डवेअरची दुकानेसुद्धा उघडण्यात येत आहे. गुरुवारपासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने उघडी असतील.

महाराष्ट्र दिनाला केवळ झेंडावंदन
१ मे रोजी येणाºया महाराष्ट्र दिनाला यावर्षी अन्य सण-उत्सवाप्रमाणेच अत्यंत साध्या व मोजक्या उपस्थितीत फक्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झेंडावंदन केले जाणार आहे. अन्य ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

भाजीपाला, धान्य मुबलक
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ९० टेम्पोमधून १५२७ क्विंटल भाजीपाल्याची थेट आवक झाली आहे. तसेच २३ टेम्पोमधून ६२३ क्विंटल फळांची आवक झाली आहे. तीन ट्रकमधून ८०३ क्विंटल कांदा, बटाटयाची आवक झाली आहे. तर ६२३ टेम्पो व १३ ट्रकमधून १२०१६.५१ क्विंटल अन्नधान्य इत्यादींची आवक झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली आहे.

७२० वाहनांवर कारवाई
नियमांचे पालन न करणाºया नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करीत जिल्ह्यातील २०७ प्रकरणात एकूण १२ लाख १४ हजार ९७० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाºया ५६ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर ७२० वाहने जप्त केली आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

सिमेंट कारखाने सुरू
चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राट्रेक, एसीसी, माणिकगड, अंबुजा, या प्रसिद्ध सिमेंट कंपन्यांच्या पाच प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. एक-दोन दिवसात या ठिकाणी पुन्हा सिमेंट उत्पादनाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. याशिवाय जिल्ह्यातील १४ उद्योजकांनी आपले उद्योग सुरू करण्याला परवानगी मागितली आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी जिल्हा प्रशासनाकडून व राज्य शासनाकडून दिल्या जात आहे. आणखी काही उद्योग व्यवसायाला जिल्ह्यांमध्ये सुरुवात होईल, अशी अपेक्षा जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: 123 in Institutional Quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.