१२३५ कोरोनामुक्त, मृत्यूचे प्रमाण घटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:56+5:302021-05-14T04:27:56+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७५ हजार १९८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ६२ हजार ७५१ ...
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७५ हजार १९८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ६२ हजार ७५१ झाली आहे. सध्या ११ हजार २५५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ४ लाख २५ हजार ८५२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ४६ हजार ९०९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ११९२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ११०१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३५,यवतमाळ ३८, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, वारंवार हात धुवावे, सुरक्षित अंतर राखावे व जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मृत
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील पंडित दीनदयाल वार्ड परिसरातील ५० वर्षीय पुरुष, रामनगर येथील ५० वर्षीय पुरुष, बाबूपेठ येथील ६० वर्षीय महिला, मराठा चौक येथील ५५ वर्षीय महिला, आगरझरी ताडोबा येथील ४९ वर्षीय पुरुष, ६९ वर्षीय महिला, भिवापूर वार्ड येथील ५६ वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील विलोडा येथील ८० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, वरोरा तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील चिचबोडी येथील ३२ वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील ३४ वर्षीय महिला, भोयेगाव येथील ७० वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील कोथुळणा येथील ५५ वर्षीय पुरुष, सावली तालुक्यातील शिरसी येथील ५० वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील गुरूदेव वार्ड येथील ६० वर्षीय पुरुष, मासळ येथील ४५ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील २८ व ५५ वर्षीय महिला, ५४ व ६० वर्षीय पुरुष तसेच मारेगाव-यवतमाळ येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह
चंद्रपूर मनपा क्षेत्र २२९
चंद्रपूर तालुका ७०
बल्लारपूर ७९
भद्रावती ६१
ब्रह्मपुरी ३४
नागभीड २२
सिंदेवाही ४१
मूल ४९
सावली ३१
पोंभूर्णा २४
गोंडपिपरी ३०
राजूरा ४१
चिमूर ०२
वरोरा ५६
कोरपना ४७
जिवती ०८
इतर ११