१२६ कि.मी.ची सायकलवारी करून क्रीडामंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:01+5:302021-05-30T04:23:01+5:30
भद्रावती : स्थानिक रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य बाॅक्सिंग संघटनेचे राज्य महासचिव डॉ. राकेश तिवारी यांनी भद्रावती-नागपूर अशी सायकलवारी करून ...
भद्रावती : स्थानिक रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य बाॅक्सिंग संघटनेचे राज्य महासचिव डॉ. राकेश तिवारी यांनी भद्रावती-नागपूर अशी सायकलवारी करून १२६ किमी अंतर ६ तास ४४ मिनिटांत पार केले. यानंतर राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून क्रीडाविषयक समस्यांबाबत निवेदन दिले. डॉ. राकेश तिवारी दि. २७ रोजी गुरुवारी पहाटे ४ वाजता भद्रावती येथून निघाले. नागपूरला सकाळी ११ वाजता पोहोचले. यानंतर त्यांनी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांना शासनाच्या क्रीडाविषयक धोरणांविषयी मागण्यांचे निवेदन सादर केले. खेलो इंडिया अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यांतून तसेच प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यातून बॉक्सिंग हा खेळ वगळण्यात आला आहे. यामुळे बाॅक्सिंग खेळाडूंवर फार मोठा अन्याय झाला आहे. मागणीनुसार खेलो इंडियाचे सेंटर मिळाले नाही. ज्यांनी मागणी केली नाही, अशांना सेंटर देण्यात आले आहे, याकडे मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले.
बाॅक्स
क्रीडाविषयक समस्या
राज्यात बाॅक्सिंग केंद्र कमी
चंद्रपुरातील बाॅक्सिंग खेळाडूंवर अन्याय
राज्यातील ३६ जिल्हा स्टेडियमच्या खासगीकरणाचा घाट
मुंबईचे धारावी स्पोर्ट्सचे खाजगीकरण
राज्यातील क्रीडा अधिकारी, प्रशिक्षकांसह अन्य पदे रिक्त