चंद्रपुरातील 1320 पूरग्रस्तांनी घेतला मनपा शाळांचा आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 05:00 AM2022-07-16T05:00:00+5:302022-07-16T05:00:29+5:30

सध्या पाऊस थांबला; पण पूर ओसरला नाही. १ हजार ३२० पूरग्रस्तांना अजूनही शाळेतच थांबविण्यात आले. पूर ओसरलेल्या भागांत संभाव्य डेंग्यू व इतर कीटकजन्य रोगांची साथ पसरण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधासाठी मनपाने डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरू केली. ब्रीडिंग चेकर्समार्फत सातत्याने पूरग्रस्त परिसरात तपासणी केली जात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत स्वच्छता, आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.

1320 flood victims of Chandrapur took shelter of municipal schools | चंद्रपुरातील 1320 पूरग्रस्तांनी घेतला मनपा शाळांचा आश्रय

चंद्रपुरातील 1320 पूरग्रस्तांनी घेतला मनपा शाळांचा आश्रय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :  पाणी घरात येईल, असे वाटतच नव्हते. त्यामुळे आम्ही रात्रभर जागे होतो. घरातील सामानही बाहेर काढले नाही. मात्र, काही कळायच्या आतच पाणी शिरले आणि होत्याचे नव्हते झाले. सारे सामान भिजले. केवळ अंगावरच्या कपड्यांसह सुरक्षित स्थळ शोधावे लागले, अशी व्यथा चंद्रपुरातील पूरबाधित नागरिकांनी शुक्रवारी व्यथा मांडली. शहरातील बहुतांश परिसरातील नागरिकांची अशीच स्थिती होती. पूर केव्हा उतरेल, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे सध्या तरी अशा १३२०  कुटुंबांना मनपाच्या शाळांचाच आश्रय घेऊन दिवस ढकलत आहेत.
सध्या पाऊस थांबला; पण पूर ओसरला नाही. १ हजार ३२० पूरग्रस्तांना अजूनही शाळेतच थांबविण्यात आले. पूर ओसरलेल्या भागांत संभाव्य डेंग्यू व इतर कीटकजन्य रोगांची साथ पसरण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधासाठी मनपाने डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरू केली. ब्रीडिंग चेकर्समार्फत सातत्याने पूरग्रस्त परिसरात तपासणी केली जात आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत स्वच्छता, आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली, अशा सर्व परिसरात ब्लिचिंग टाकून फॉगिंग केले जात आहे. नाल्यांवर फवारणी केली जात आहे. 
बांधकाम विभागामार्फत नाली कवर व इतर धोकादायक खड्डे यांची तपासणी करून भरण टाकल्या जात आहे. यांत्रिकी विभागामार्फत आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी टँकर पुरविणे सुरू झाले. खबरदारी म्हणून महानगरपालिका शाळा, तसेच इतर ठिकाणी असलेल्या १३२० पूरग्रस्तांना शाळेतच थांबविण्यात आले आहे. आयुक्त राजेश मोहिते व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून संभाव्य परिस्थितीसाठी सज्ज आहेत. पाणी वाढतच असल्याने आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात केले.

१९ वसाहतींमध्ये पुराचे पाणी
सध्या पाऊस थांबला. मात्र, इरईचे धरणाचे सर्व दरवाजे एक मीटरने उडण्यात आले. त्यामुळे इरई नदीची पूरस्थिती जैसे थे आहे. रहमत नगर, सिस्टर कॉलनी, ठक्कर कॉलनी, आंबेडकर भवन परिसर वडगाव, राजनगर, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलनी, दादमहल, दाताळा पूल परिसर, पठाणपुरा गेट, हवेली गार्डन, विठ्ठल मंदिर वाॅर्ड, झरपट नदी, महाकाली वाॅर्ड, शक्तीनगर, दुर्गापूर परिरातील पुराचे पाणी कमी झाले नाही. 

जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना इशारा
मुसळधार पावसाने थोडी उसंत दिली. मात्र, विभागीय हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तविली. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे. गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडल्याने पूर आला. इकडे वर्धा नदीला पूर असल्याने पाणी नदीच्या दिशेने पसरण्याची शक्यता आहे. इरई नदी काठालगत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. पूर ओसरेपर्यंत कुणीही त्या परिसरात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 

 

Web Title: 1320 flood victims of Chandrapur took shelter of municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.