मूल तालुक्यात कोरोनाचे १३४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:26 AM2021-04-13T04:26:38+5:302021-04-13T04:26:38+5:30
फोटो : कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर ठोक भाजीपाला विक्रीसाठी उसळलेली गर्दी मूल : कोरोनाचा संसर्ग मूल शहरासह तालुक्यातदेखील वाढत असून ...
फोटो : कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर ठोक भाजीपाला विक्रीसाठी उसळलेली गर्दी
मूल : कोरोनाचा संसर्ग मूल शहरासह तालुक्यातदेखील वाढत असून सध्या १३४ रुग्ण उपचार घेत आहेत. यात मूल उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या कोविड केंद्रात ५० रुग्ण, गृहविलगीकरण ७८ व इतरत्र उपचार घेत असलेल्या सात रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीणपेक्षा मूल शहरात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते आहे. मूल शहरात कर्मवीर महाविद्यालयाच्या मैदानावर दररोज ठोक व्यापारी भाजीपाला विक्री करीत असतात. दिवसेंदिवस यात गर्दीचे प्रमाण वाढले असून कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे वाटू लागले आहे. मूल उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या कोविड केंद्राची रुग्णक्षमता ५० वरून वाढवून ७० करण्यात आली आहे. यावरही रुग्ण वाढल्यास स्वामी विवेकानंद विद्यालयाजवळ नगर परिषदेने बांधलेल्या शाळेमध्ये कोविड केंद्र तयार करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. उज्ज्वल इंदूरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने जनतेने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचे रुग्ण वाढणार नाही, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वल इंदूरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. तीरथ उराडे यांनी केले आहे.