तालुक्यात ६० वर्षांवरील १३,७९३ व्यक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:10+5:302021-03-04T04:54:10+5:30
नागभीड : नागभीड तालुक्यात ६० वर्षे व त्यावरील व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मोहीम बुधवारपासून सुरू झाली आहे. तालुक्यात ...
नागभीड : नागभीड तालुक्यात ६० वर्षे व त्यावरील व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मोहीम बुधवारपासून सुरू झाली आहे. तालुक्यात ६० वर्षांवरील १३ हजार ७९३ एवढ्या व्यक्ती असून पहिल्या दिवशी २७ व्यक्तींना लस देण्यात आली.
आरोग्य विभागाकडून जून २०२० मध्ये ६० वर्षे व त्यावरील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार या तालुक्यात ६० वर्षे व त्यावरील व्यक्तींची संख्या १३ हजार ७९३ आहे. नागभीड तालुक्यात ३२ हजार ८१७ घरे आहेत. तर एक लाख ३७ हजार ८८९ लोकसंख्या आहे. या ६० वर्षे व त्यावरील व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मोहीम बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. सध्यातरी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या मोहिमेत ४५ ते ५९ वर्षांच्या व्यक्तींनाही लस देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी २० प्रकारच्या आजांराची अट आहे. आजार असल्याचे प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच या वयोगटातील व्यक्तींना ही लस घेता येणार आहे.
कोट
सध्या ग्रामीण रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्यास प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ही लस उपलब्ध करून देण्यात येईल.
- डाॅ.विनोद मडावी, तालुका आरोग्य अधिकारी, नागभीड.