१४२ कोटींची विकास कामे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:25 PM2018-07-18T23:25:07+5:302018-07-18T23:25:27+5:30
राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील १४२ कोटी रूपये किंमतीच्या विकासकामांना केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी दिली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील १४२ कोटी रूपये किंमतीच्या विकासकामांना केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी दिली आहेत.
भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या १९ जून २०१८ च्या पत्रान्वये सदर विकासकामांना मंजूरी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ८० कोटी रूपये किंमतीचे कोसारा- सोईट - मोहुर्ली- चंद्रपूर-जुनोना-सातारा-पोंभूर्णा-नवेगाव मोरे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, १२ कोटी रूपये किंमतीचे मूल-चामोर्शी रस्त्यावरील उमा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करणे, २५ कोटींचे बल्लारपूर तालुक्यातील मानोरा फाटा ते इटोली आणि इटोली-किन्ही-ऐनबोडी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच २५ कोटी रूपये किंमतीचे राजुरा तालुक्यातील राजुरा-चुनाळा-चनाखा-धानोरा-अन्नूर-अंतरगाव या रस्त्याची सुधारणा करणे या विकास कामांचा समावेश आहे. या महत्वपूर्ण विकासकामांसाठी १४२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.