मिनी मंत्रालयात सहा महिन्यांत 149 अधिकारी,कर्मचारी निवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 05:00 AM2022-07-01T05:00:00+5:302022-07-01T05:00:07+5:30
पंचायतराज व्यवस्थेत जिल्हा परिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जि.प. मध्ये आधी पुरेसे मनुष्यबळ नाही. एका अधिकाऱ्याकडे विविध विभागांचा प्रभार असल्याने कुर्मगतीने कारभार सुरू आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तारीख अजूनही निश्चित झाली नाही. त्यामुळे प्रशासकराज कालखंडातील कारभार अगदी कोरड्या मनाने चालविले जाते, असा आरोप नागरिकांकडून यापूर्वीही झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकराज सुरू आहे. त्यातच नवीन पदभरती बंद असताना मागील सहा महिन्यांत तब्बल १४९ अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाले होते. बुधवारी पुन्हा ७३ अधिकारी-कर्मचारी नियत वयोमानाने निवृत्त झाल्याने विविध विभागांचा कामकाज चालणार, कसा असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
पंचायतराज व्यवस्थेत जिल्हा परिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जि.प. मध्ये आधी पुरेसे मनुष्यबळ नाही. एका अधिकाऱ्याकडे विविध विभागांचा प्रभार असल्याने कुर्मगतीने कारभार सुरू आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तारीख अजूनही निश्चित झाली नाही. त्यामुळे प्रशासकराज कालखंडातील कारभार अगदी कोरड्या मनाने चालविले जाते, असा आरोप नागरिकांकडून यापूर्वीही झाला होता.
अशा परिस्थितीत सहा महिन्यांपूर्वी १४९ अधिकारी- कर्मचारी निवृत्त झाले. बुधवारी पुन्हा विविध विभागांतर्गत व विविध पंचायत समित्यांतर्गत कार्यरत वर्ग १ ते ४ चे एकूण ७३ अधिकारी- कर्मचारी निवृत्त झाल्याने आकृतीबंधानुसार अनेक पदे रिक्त झाली आहेत.
अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनुषंगिक लाभासह निरोप
जि.प. कर्मचायांना बुधवारी जि.प. कन्नमवार सभागृहात निरोप समारंभ पार पडला. सेवानिवृत्तीच्या दिवशी अनुषंगिक लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संग्राम शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी धर्मराव पेंदाम, उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे उपस्थित होते. सहायक प्रशासन अधिकारी नितीन फुलझेले यांनी संचालन केले. कनिष्ठ प्रशासन अधिकारी विलास मांडवकर यांनी आभार मानले. यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.