धोपटाळा प्रकल्पाचे करारनामे १५ दिवसात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:01 PM2018-11-06T23:01:25+5:302018-11-06T23:01:42+5:30
मागील दोन वर्षांपासून सेक्शन-२ झाल्यानंतरसुध्दा पुढील कार्यवाहीसाठी थांबून असलेल्या बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील यु.जी.टू ओ.सी., धोपटाळा प्रकल्पाचे सीबी अॅक्ट १९५७ नुसार पुढील सेक्शन लवकरच लागू होवून प्रकल्पाची पुढील कार्यवाही अधिक गतीने लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून सेक्शन-२ झाल्यानंतरसुध्दा पुढील कार्यवाहीसाठी थांबून असलेल्या बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील यु.जी.टू ओ.सी., धोपटाळा प्रकल्पाचे सीबी अॅक्ट १९५७ नुसार पुढील सेक्शन लवकरच लागू होवून प्रकल्पाची पुढील कार्यवाही अधिक गतीने लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
वणी क्षेत्रीय कार्यालय ताडाळी येथे वरिष्ठ वेकोलि अधिकाºयांची बैठक ना. अहीर यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी वेकोलिचे सीएमडी आर.आर. मिश्रा, कार्मिक निदेशक संजय कुमार तसेच राजुºयाचे आमदार अॅड. संजय धोटे, चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, वणीचे आमदार संजयरेड्डी बोदकुरवार, विजय पिदूरकर, राहुल सराफ, ब्रिजभुषण पाझारे, अॅड. प्रशांत घरोटे, धनंजय पिंपळशेंडे आदी उपस्थित होते. यावेळी ना. हंसराज अहीर यांनी सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला व यामध्ये धोपटाळा प्रकल्पाची कॉस्ट प्लसमधील समस्या मोकळी झाली असल्यामुळे त्याची पुढील कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, रद्द होण्याच्या मार्गावर असलेला हा प्रकल्प ना. अहीर यांच्या प्रयत्नांमुळे आज पुन्हा चालू होत आहे. १५ दिवसात कामाला सुरूवात करू, सीएमडी मिश्रा यांनी सांगितले.