१५ नवीन पुलांमुळे रहदारीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:51 PM2019-08-04T22:51:39+5:302019-08-04T22:52:36+5:30
तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी तब्बल १५ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही रस्ते बंद न झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भोजराज गोवर्धन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी तब्बल १५ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसातही रस्ते बंद न झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात होणार त्रास दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात २६ नविन पुलांसाठी निधी मंजूर केला. यामधील हळदी ते नलेश्वर या मार्गावर तीन पुलांचे काम पूर्ण झाले आहे. चिचाळा ते कवळपेठ यामार्गावर दोन, जानाळा ते सुशी मार्गावर २, नवेगांव-कोरंबी-बेंबाळ मार्गावर तीन, मूल ते चार्मोशी एक, चिखली ते कन्हाळगांव मार्गावर एक तर पेठगांव भादुर्णी मार्गावर दोन पुलांचे काम पूर्ण झाले आहेत. काही पुलांचे काम अंतीम टप्प्यात आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले यांनी संबंधित अभियंत्यांना मार्गदर्शन करून काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी प् प्रयत्न केले. येणाऱ्या काही दिवसांत यामार्गावरून रूंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने नागरिकांना ये-जा करणे सुलभ होणार आहे.
मूल तालुक्यात पाच मोठे बंधारे मंजुर करून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल येथे निधी उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील चिरोली येथे एक कोटी ९१ लाख, ताडाळा येथे पुल आणि बंधाºयासाठी १४ कोटी ९० लाख, चिमढा येथे ९ कोटी ९० लाख, नलेश्वर येथे पुल आणि बंधाºयासाठी ६ कोटी, सिंतळा येथे पुल आणि बंधारा १७ कोटी ९० लाख रुपए निधी मंजुर करण्यात आले आहे. ना.मुनगंटीवार यांनी भुमीपूजन केलेल्या चिरोली येथील बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.
सदर बंधाऱ्यामुळे तालुक्यात जलसाठ्यामध्ये वाढ होणार असुन मच्छीमारी व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता आहे. या बंधाऱ्यातील पाणी दोन ते अडीच किमीपर्यंत साठा राहणार असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी महत्वाचे ठरणार आहे. बंधाऱ्यामुळे सुमारे दोनशे हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. भविष्यात पाणी टंचाई भासु नये यासाठी लिफ्टच्या आधारे जवळपास असलेल्या मामा तलावात या बंधाºयांतील पाणी सोडण्यात येणार असल्याने चिरोली परिसरातील शेतकºयाांना याबंधाऱ्याचा चांगलाच फायदा होणार आहे.