१५ पशुधन विकास केंद्रातून श्वेतक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:20 PM2019-01-07T23:20:05+5:302019-01-07T23:20:31+5:30

विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतीसोबतच आर्थिक स्तर सुधारण्याच्या हेतूने दूध उत्पादनाच्या जोडधंद्याला गंभीरतेने सुरुवात करावी, यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्यावतीने जिल्ह्यातील मारोडा येथून श्वेतक्रांतीला सुरुवात केली जात आहे. दुध उत्पादन वाढीसाठी पशुवंश सुधार कार्यक्रम तसेच एकात्मिक पशुधन विकास केंद्र निर्मिती अभियानाअतंर्गत जिल्ह्यात १५ केंद्र्र सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मारोडा येथे केली.

15 White Revolution from Livestock Development Center | १५ पशुधन विकास केंद्रातून श्वेतक्रांती

१५ पशुधन विकास केंद्रातून श्वेतक्रांती

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची घोषणा : मारोडा येथे पशुधन विकास केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतीसोबतच आर्थिक स्तर सुधारण्याच्या हेतूने दूध उत्पादनाच्या जोडधंद्याला गंभीरतेने सुरुवात करावी, यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्यावतीने जिल्ह्यातील मारोडा येथून श्वेतक्रांतीला सुरुवात केली जात आहे. दुध उत्पादन वाढीसाठी पशुवंश सुधार कार्यक्रम तसेच एकात्मिक पशुधन विकास केंद्र निर्मिती अभियानाअतंर्गत जिल्ह्यात १५ केंद्र्र सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मारोडा येथे केली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, सभापती पूजा डोहणे, वर्षा लोणारे, प्रेमदास गेडाम आदींची उपस्थिती होती.
ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, रविवारी पोंभूर्णामध्ये स्वीट क्रांतीला सुरूवात केल्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील श्वेतक्रांतीचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकट्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये २७ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. मात्र जिल्ह्यामध्ये केवळ ५ हजार लिटर दुधाचे उत्पादन होते. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकºयांकडे उत्पादनाची जोड शेतीला आहे. विदर्भातील शेतकºयांनीही हा बदल आत्मसात करावा, असेही ना. मुनंगटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांना अभिवादन करताना त्यांच्या मारोडा या गावात विविध विकास कामे करताना आनंद होत असल्याचे सांगितले. मारोडा गावाच्या विकासामध्ये निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. या संवादाचा उल्लेख करून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, विश्वशांती महाविद्यालयाची सुरक्षाभिंत लवकरच पूर्ण केल्या जाईल. याठिकाणी देण्यात आलेल्या दिव्यांगांच्या अर्जानुसार पुढील आठवडाभरात तीनचाकी सायकलींचे वाटप करू, अशी घोषणाही त्यांनी केली. पशुवंश सुधार कार्यक्रम व एकात्मिक पशुधन विकास केंद्राच्या माध्यमातून स्थानिक देशी आणि कमी दूध देणाºया पशुधनाला कृत्रिम रेतनाद्वारे व आधुनिक उपचारामार्फ त अधिक क्षमतेच्या दुध उत्पादक पशुधनामध्ये बदल करण्यात येते. भाकड जनावरांनादेखिल याचा लाभ होणार आहे. देशातल्या २२ राज्यात सध्या हा प्रयोग जे .के. ट्रस्टमार्फत केला जात आहे. मारोडा येथील केंद्र शेतकºयांच्या प्रगतीला चालना देणार असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी नमुद केले.
सर्व अंगणवाड्या आयएसओ करणार
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनूले यांनी विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केल्यानुसार ६० लक्ष रुपयांचा निधी मारोडा या गावांच्या विविध विकास कामासाठी दिला जाईल. मतदार संघातील प्रत्येक गावांमध्ये ११ लाख रूपये खर्च करून आरो मशीन तसेच सर्व महिलांच्या घरी गॅस जोडणी करण्यात येईल. सर्व अंगणवाड्यांना आयएसओ करण्याची घोषणा पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केली. शेतकºयांना डुक्कर व रोहींपासून होणाºया त्रासाची नोंद घेऊन नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाल्यास मोबदला देण्याचा कायदा केला जाणार आहे. शेतकºयांना व्यक्तिगत कुंपणासाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Web Title: 15 White Revolution from Livestock Development Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.