१५ व १६ ला धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:07 PM2018-10-13T23:07:34+5:302018-10-13T23:07:51+5:30

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला. या घटनेला उजाळा म्हणून लाखो बौद्ध बांधव दरवर्षी दीक्षाभूमीवर समतेचा जागर करतात. ही आठवण सतत व्हावी म्हणून येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६२ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देश-विदेशातील भंतेची उपस्थिती राहणार आहे.

The 15th and the 16th Circulation Monitoring Function | १५ व १६ ला धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा

१५ व १६ ला धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला. या घटनेला उजाळा म्हणून लाखो बौद्ध बांधव दरवर्षी दीक्षाभूमीवर समतेचा जागर करतात. ही आठवण सतत व्हावी म्हणून येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६२ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देश-विदेशातील भंतेची उपस्थिती राहणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने आयोजित धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला १५ आॅक्टोबरला सायंकाळी ४ वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शांती मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. यावेळी भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई, महाथेरो भदंत ज्ञानज्योती महास्थवीर उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता धम्मध्वजारोहण होईल. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण घोटेकर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी उपस्थित राहतील.
१६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशासह लक्षवेधक मिरवणूक दीक्षाभूमीपर्यंत काढण्यात येणार आहे. मुख्य समारंभ सायंकाळी ५ वाजता होईल. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू, ना. रामदास आठवले, ना. राजकुमार बडोले, आ. नाना श्यामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित राहतील.

Web Title: The 15th and the 16th Circulation Monitoring Function

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.