जिल्ह्यात १६ भरारी पथकांची कृषी केंद्रांवर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 05:00 AM2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:01:11+5:30
मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री तसेच दर्जाहीन बियाणे विक्री करण्याचा प्रकार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खत, बियाणे विक्रीवर सदर पथक नजर ठेवणार असून जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर पथक अचानक भेट देऊन कृषी केंद्र तपासणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे, खतांची खरेदी करीत आहे. याचाच फायदा घेत काही व्यावसायिक शेककऱ्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यात १६ भरारी पथकांची निर्मिती केली असून सदर पथक जिल्ह्यातील प्रत्येक कृषी केंद्रांवर लक्ष ठेवून राहणार आहे. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने विक्री तसेच दर्जाहीन बियाणे विक्री करण्याचा प्रकार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन खत, बियाणे विक्रीवर सदर पथक नजर ठेवणार असून जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर पथक अचानक भेट देऊन कृषी केंद्र तपासणार आहे.
खरीप हंगाम सुरू झाला असून खत तसेच बियाण्याची कृषी विभागाकडून काही महिन्यापूर्वीच मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार मागील काही दिवसापासून विविध कंपन्याचे खत तसेच बियाणे जिल्ह्यात दाखल झाले असून ग्रामीण भागातील विक्रेत्यांना वितरित केले जात आहे. शेतकºयांची कोणत्याही परिस्थितीत फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहे. कृषी केंद्रांना अचानक भेटी देऊन खत, बियाणे त्यासंबंधीची कागदपत्रे आदींची तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तसेच जिल्हास्तरावर एक पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात तालुका कृषी अधिकारी तसेच पाच विभागातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही कृषी केंद्रात जाऊन तपासणी करण्याचा अधिकार या पथकाला आहे. तपासणीदरम्यान कृषी केंद्रात गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कापूस उत्पादक तालुक्यांमध्ये सध्या कपाशीची लागवड केली जात आहे. तर धान उत्पादक शेतकरीही शेतीच्या मशागतीच्या कामाला लागले आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कपाशीऐवजी शेतकरी सोयाबीनला अधिक पसंती देतील, असे बोलल्या जात आहे.
शेतकऱ्यांना करता येणार तक्रार
पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची बी-बियाणे घेण्यासाठी लगबस सुरू झाली आहे. याचाच फायदा घेत काही व्यावसायिक त्यांची फसवणूक करतात. फसवणूक होत असेल तर शेतकºयांनी थेट कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकºयांना आपली फसगत झाल्याची तक्रार करता यावी यासाठी तालुकास्तरावर तकार निवारण केंद्राची स्थापनाही कृषी विभागाने केली आहे.
एक आणि प्रत्येक तालुक्याक एक असे १६ पथक जिल्ह्यात राहणार असून शेतकºयांनी तक्रार केल्यास तत्काळ कार्यवाही केली जाणार असून कृषी केंद्राची तपासणी करण्याचे पूर्ण अधिकार सदर पथकांना देण्यात आले आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर काही कृषी केंद्र संचालक शेतकºयांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या केंद्रावर वॉच ठेवण्यासाठी कृषी विभागाने पथकांची नेमणूक केली आहे. सदर पथक कृषी केंद्रांची तपासणी करणार आहे. गैरप्रकार आढळल्यास शेतकºयांनी तक्रार करावी.
-उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी