कोरपना - वणी मार्गावर पिकअप उलटल्याने १६ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:25 AM2020-12-23T04:25:26+5:302020-12-23T04:25:26+5:30
हेटी गावालगचीची घटना : सात जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले कोरपना : वरोराकडे जाणारी पिकअप उलटल्याने सात गंभीर ...
हेटी गावालगचीची घटना : सात जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले
कोरपना : वरोराकडे जाणारी पिकअप उलटल्याने सात गंभीर तर नऊ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कोरपना - वणी मार्गावरील हेटी गावाजवळ घडली. गंभीर जखमींना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.
वरोरा तालुक्यातील पारधी टोला (चिनोरा) येथून नन्नावरे, दडमल, शेरकुरे हे कुटुंब कुलदेवता पूजनाचे कोरपना तालुक्यातील पारधीगूडा येथे आले होते. कार्यक्रम पार पडल्यानंतर एमएच ३१, सीक्यू ७४८२ क्रमाकांच्या पिककपने गावाकडे परत जात होते. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हेटी गावाजवळ पिकअप उलटला. या घटनेत यात बंडू भीमराव दडमल (२८) , संगीता शेरकूरे (३५), शांता मोरेश्वर शेरकुरे (४०), सुरेखा संतोष ननावरे (४६), सीमा राजू दडमल (३५), अचल संतोष ननावरे (११), ज्योती शेरकूरे (३५) हे गंभीर जखमी झाले. कोरपना पोलिसांनी गंभीर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. शारदा सदाशिव ननावरे (३७), वेणूबाई ननावरे (६३), रंजित गजानन चौधरी (३०), काजल रितेश ननावरे (१६), दशरथ ननावरे (७०), नंदा शेरकुरे (५०), जितेंद्र ननावरे(२८), वनिता शेरकुरे (४२), फुलाबाई भोसरे (५५) सर्व रा. पारधी टोला (चिनोरा) अशी किरकोळ जखमींची नावे आहेत. किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे दाखल करण्यात आलले. पुढील तपास ठाणेदार अरूण गुरनूले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे