चंद्रपुरात १६ लाखांचे बोगस कापूस बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 09:10 PM2020-06-25T21:10:00+5:302020-06-25T21:10:39+5:30
चंद्रपुरात गोपनीय माहितीवरून विरुर पोलिसांनी पाळत ठेऊन सदर वाहनाची तपासणी केली असता एक हजार किलो कापूस बियाणे आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: बोगस बियाणे असलेले वाहन येत असल्याच्या गोपनीय माहितीवरून विरुर पोलिसांनी पाळत ठेऊन सदर वाहनाची तपासणी केली असता एक हजार किलो कापूस बियाणे आढळून आले.
वाहन चालक भास्कर पेटयारी व जंगी रेड्डी रा. हैद्राबाद यांना याबाबत विचारणा केली असता सदर बियाणे श्रीनिवास मामेडपल्लीवार रा. आसिफाबाद आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील आनंद पेरगूरवार यांचे असल्याचे सांगितले. चालकासह बियाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर बियाणे कृषी विभागाकाकडे तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल २४ जून रोजी प्राप्त झाला असून हे बियाणे शासन मान्य नसलेल्या कंपनीचे (बोगस) असल्याचे अहवालात सांगण्यात आले. या अहवालावरून आरोपींविरुद्ध विरुर पोलीस ठाण्यात बी बियाणे अधिनियम नुसार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत १६ लाख २२ हजार रुपये किमतीचे बियाणे आणि वाहन (किंमत पाच लाख रुपये) असा एकूण २१ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी, उपनिरीक्षक सदानंद वडतकर, देवाजी टेकाम, दिवाकर पवार, सुनील राऊत, संघपाल गेडाम, अमोल सावे, अशोक मडावी, प्रल्हाद जाधव, भगवान मुंडे, सुरेंद्र काळे यांनी केली.