आयटीआयला १६१२ प्रवेश; सर्वाधिक पसंदी इलेक्ट्रीशियनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:55+5:302020-12-22T04:26:55+5:30

चंद्रपूर : दरवर्षी आयटीआय प्रवेशाला मोठी चढाओढ असायची. मात्र यंदा कोरोनामुळे आयटीआय प्रवेशाला विलंब झाला. परिणामी प्रवेशाची तिसरी फेरी ...

1612 admission to ITI; The most preferred electrician | आयटीआयला १६१२ प्रवेश; सर्वाधिक पसंदी इलेक्ट्रीशियनला

आयटीआयला १६१२ प्रवेश; सर्वाधिक पसंदी इलेक्ट्रीशियनला

Next

चंद्रपूर : दरवर्षी आयटीआय प्रवेशाला मोठी चढाओढ असायची. मात्र यंदा कोरोनामुळे आयटीआय प्रवेशाला विलंब झाला. परिणामी प्रवेशाची तिसरी फेरी संपूनही जिल्ह्यातील १८ शासकीय आयटीआयमधील ३६२१ जागेपैकी केवळ १६१२ जागाच भरल्या आहेत. तर २००९ जागा शिल्लक आहेत. त्यामुळे यंदा जागा भरतील की नाही, असे चिन्ह दिसून येत आहेत.

व्यवसायिक शिक्षणाद्वारे रोजगारांच्या संधी उपलब्ध होत असल्याने आता आयटीआय प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली होती. त्यामुळे चांगले मार्क घेऊनही शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश मिळत नव्हता. खासगी आयटीआयमध्ये वरेमाप शुल्क भरुन प्रशिक्षण घेत होते.

चंद्रपूर जिल्ह्यात १८ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहेत. तेथील प्रवेश क्षमता ३६२१ आहे. तेथे इलेक्ट्रीशियन, वायरमन, फिटर, मोटर मेकॅनिक, कम्प्युटर ॲापरेटर कम असिस्टंट, सुतारकाम, मशिनिस्ट, टर्नर, वेल्डर, मुलींसाठी ड्रेस्क मेकिंग यासारखे अनेक ट्रेड्स उपलब्ध आहेत. दरवर्षी इलेक्ट्रीशियन, फिटर या ट्रेडला मोठ्या प्रमाणात मागणी राहत होती. तरीही संपूर्ण ट्रेडच्या जागा भरल्या जात होत्या. मात्र यंदा चित्र पालटल्याचे दिसून येत आहेत.

शासकीय आयटीआयसह खासगी आयटीआयमधील जागा तिसरी फेरी संपूनही रिक्त आहेत.

पुन्हा चौथी आणि पाचवी फेरी घेण्यात येणार आहे. मात्र तरीही जागा पूर्ण भरतील की नाही, याबाबत सांशकता आहे.

बॉक्स

१६१२ प्रवेशप्रक्रिया

पार पडल्या

कोरोनामुळे आयटीआय प्रवेश प्रक्रीया लांबणीवर गेली होती. आतापर्यंत तीन प्रवेशफेऱ्या झाल्या. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १६१२ जागा भरण्यात आल्या. तर खासगी आयटीआयमध्ये १२५३ जागा भरल्या आहे. पुन्हा दोन फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर जागा भरण्याची शक्यता आहे. अनेकांनी इतर क्षेत्रात प्रवेश घेतल्याने जागा भरण्याबाबत सांशकता आहे.

बॉक्सविद्यार्थ्यांचा कल इलेक्ट्रीशियन ट्रेडकडे

इलेक्ट्रीशियन ट्रेडद्वारे शासकीय व खासगी विभागाद्वारे काम भेटण्याची शक्यता आहे. किंवा स्वत:चा व्यवसाय टाकता येऊ शकतो. त्यामुळे या ट्रेडची मोठी मागणी असते. खासगी आयटीआयमध्ये या ट्रेडसाठी वारेमाप पैसे मोजले जातात.

Web Title: 1612 admission to ITI; The most preferred electrician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.