एकाच दिवशी १६ हजार ५०० जणांनी घेतला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:05+5:302021-05-14T04:28:05+5:30
राज्य सरकारच्या सूचनेनुसार दुसरा डोस म्हणजे बुस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी ४५ वर्षांवरील वयोगटासाठी जिल्ह्यात ...
राज्य सरकारच्या सूचनेनुसार दुसरा डोस म्हणजे बुस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी ४५ वर्षांवरील वयोगटासाठी जिल्ह्यात ६० स्वतंत्र केंद्र तयार करण्यात आले होते. याशिवाय ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या ४४ वयोगटासाठी ६० केंद्र सज्ज ठेवण्यात आले. प्रत्येक केंद्राला ४०० ते ५०० डोस उपलब्ध करून दिल्याने कुपन घेणाऱ्या नागरिकांना आज फारसा त्रास झाला नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली. ग्रामीण भागातील केंद्रांवर सायंकाळी ५ वाजतापर्यंत लसीकरण सुरू होते. जिल्ह्यात ३९ हजार २४० सहव्याधी नागरिकांनी पहिला डोस घेतला. त्यातही अनेकांना लस घेणे शक्य झाले. या आठवड्यात पहिल्यांदाच कोव्हॅक्सिन व कोविडशिल्ड लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे या आठवड्यात सलग सहा दिवस लसीकरण सुरू राहणार आहे.