मूल तालुक्यात कोरोनाचे १६७ रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:27 AM2021-04-17T04:27:37+5:302021-04-17T04:27:37+5:30
मूल तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार यशवंत पवार, मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, वैद्यकीय ...
मूल तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार यशवंत पवार, मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डाॅ. तिरथ उराडे यांचे पथक प्रयत्न करीत आहे. त्याला काही प्रमाणात यश येत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना तपासणी केंद्रात चाचण्याचे प्रमाण वाढविण्यात आले असून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वल इंदुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे हे विशेष लक्ष देत आहेत. मूल उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केंद्रात ७० बेड आहेत. तर स्वामी विवेकानंद विद्यालयाजवळील नगर परिषदेने बांधलेल्या शाळेत १०० बेडचे कोविड केंद्र तयार करण्यात येणार आहे. यामुळे मूल शहराबरोबरच तालुक्यातदेखील कोविड रुग्णांना दिलासादायक ठरणार आहे.
बॉक्स
भाजीबाजार ठरू शकतो धोकादायक
मूल शहरात कर्मवीर महाविद्यालयाच्या मैदानावर दररोज ठोक व्यापारी भाजीपाला विक्री करीत असतात. येथे शहरातील व्यापाऱ्यांसह तालुक्यातील छोटे-मोठे विक्रेते मोठ्या प्रमाणात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.