१६८ नवीन पॉझिटिव्ह आढळले, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:55 AM2020-12-04T04:55:33+5:302020-12-04T04:55:33+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १६२ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर १६८ नवीन रूग्णांची भर ...

168 new positives found, both dead | १६८ नवीन पॉझिटिव्ह आढळले, दोघांचा मृत्यू

१६८ नवीन पॉझिटिव्ह आढळले, दोघांचा मृत्यू

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १६२ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर १६८ नवीन रूग्णांची भर पडली. दोन बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या ३०८ झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २० हजार २८३ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १८ हजार ६६ झाली.जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५१ हजार ९०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख २९ हजार ३७१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्या बाधितांमध्ये वरोरा शहरातील ४८ वर्षीय पुरूष व चंद्रपूर तालुक्यातील घंटाचौकी येथील ४७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०८ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील २८५, तेलंगणा, बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली १४, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आलेल्या १६८ रूग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ५३, चंद्रपूर तालुक्यातील सहा, बल्लारपूर आठ, भद्रावती ३४, ब्रह्मपुरी नऊ, नागभिड सात, मूल दोन, सावली दोन, गोंडपिपरी दोन, राजुरा सहा, चिमूर २३, वरोरा १०, कोरपना चार व इतर ठिकाणच्या दोन रूग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कवापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 168 new positives found, both dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.