लोहसहभागातून काढला १७०० घनमीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 10:08 PM2018-11-04T22:08:27+5:302018-11-04T22:08:50+5:30

राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने’ला चिमूर तालुक्यातील लोहारा येथील सरपंच व गावकऱ्यांनी पाठबळ दिल्यामुळे सातराशे घनमीटर गाळ काढण्यात यश आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

1700 cubic meter sludge removed from iron division | लोहसहभागातून काढला १७०० घनमीटर गाळ

लोहसहभागातून काढला १७०० घनमीटर गाळ

Next
ठळक मुद्देउत्पन्नात वाढ : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने’ला चिमूर तालुक्यातील लोहारा येथील सरपंच व गावकऱ्यांनी पाठबळ दिल्यामुळे सातराशे घनमीटर गाळ काढण्यात यश आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
राज्य शासनाच्या ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील लोहारा या गावामध्ये गाळ काढण्याचे काम करण्यात आले. सरपंच रागिना सोनवाने यांनी व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामध्ये सहभागी झालेले भूषण शेंडे यांनी याबाबत जनजागृती केली. या परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची शेती असून जवळपास १४ शेतकºयांना मामा तलावातील गाळ या योजनेमुळे शेतात टाकता आला.
सुपीक गाळ टाकल्यामुळे या परिसरातील धान व तुर पिकाला मोठ्या प्रमाणात मदत झाला तसेच रासायनिक खाताचा पैसा वाचल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.
अशी होते अंमलबजावणी
धरणामध्ये साचलेला गाळीसाठी धरणालगतच्या क्षेत्रातील शेतकºयांकडून करण्यात येणारे मागणीचे प्रस्ताव संबंधित गावातील सरपंच किंवा अशासकीय संस्था, स्थानिक मंडळांमार्फत संबंधित तहसीलदार यांना सादर करण्यात येतात. प्रस्तावानुसार शासकीय यंत्रणेमार्फत धरणातील जलसाठा, गाळ उपसा परिमाण, गाळ व मृद चाचण्या आदी बाबी प्रमाणित करून त्यानुसार प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात येते. एसडीपीओकडून देण्यात येणाºया प्रशासकीय मान्यतेनुसार प्रत्यक्ष गाळ उपसण्याची कार्यवाही होते.

Web Title: 1700 cubic meter sludge removed from iron division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.