नेत्र शिबिराचा १७२७ रुग्णांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:50 PM2017-09-14T22:50:33+5:302017-09-14T22:50:54+5:30
नेत्र विकारग्रस्त रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, त्यांच्या दारापर्यंत नेत्रविकार तज्ज्ञ पोहचावेत, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नेत्र विकारग्रस्त रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, त्यांच्या दारापर्यंत नेत्रविकार तज्ज्ञ पोहचावेत, त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून नेमके उपचार व्हावेत, हाच या मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिरामागचा उद्देश असून अशा शिबिराच्या माध्यमातून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील नेत्र रुग्णांना उपचारांतून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नेत्र रुग्णांनी या शिबिराच्या माध्यमातून आपल्या डोळ्यांचे आरोग्य अबाधित राखावे व अधिकाधिक रुग्णांनी अशा शिबिराचा लाभ घ्यावा. भविष्यात नेत्र तपासणी शिबिराबरोबरच आरोग्य विषयक शिबिराचेही आयोजन करून डॉक्टर आपल्या दारी ही संकल्पना राबविली जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वरोरा तालुक्यातील शेगांव (बु) या गावात आयोजित नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.
या शिबिरास माजी मंत्री संजय देवतळे, भाजप विधानसभा प्रमुख विजय राऊत, बाबा भागडे, नगराध्यक्ष अहतेशाम अली, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, ओमप्रकाश मांडवकर, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, पं.स. सभापती रोहिनी देवतळे, नरेंद्र जीवतोडे, उपसभापती विजय आत्राम, जि.प. सदस्य ज्योती वाकडे, रमेश मानकर गुरुजी, रवींद्र कष्टी, शुभांगी निंबाळकर, राजू बच्चूवार, जि.प. सदस्य राजू गायकवाड, पं.स. सदस्या तुषार सोमलकर, पं.स. सदस्य रवींद्र धोपटे, पं.स. सदस्य पपिता गुळघाने, जि.प. सदस्य विद्या किन्नाके, पं.स. नारायण कारेकर, पं.स. वंदना दाते आदींची उपस्थिती होती. या शिबिरात २०३५ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. यापैकी १७२७ रुग्णांची नेत्र चिकित्सा करुन त्यांना चष्म्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ७० हून अधिक नेत्र रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. या शिबिरात डॉ. प्रकाश पिल्लई, डॉ. केतन सोनी, डॉ. शमा खान, डॉ. अमित राजा, डॉ. समाधान रांगटे, डॉ. ईश्वर वंजारी, डॉ. दीपक अंबाडे, डॉ. येरमे आदींनी मोलाचे योगदान दिले.
याप्रसंगी बोलताना ना. अहीर म्हणाले, ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांची उपचाराच्या बाबतीत सातत्याने उपेक्षा आणि हेळसांड होत असते. जवळपास नेत्र विकाराशी संबंधित सुविधांच्या अभावामुळेही ग्रामीण क्षेत्रातील नागरिक डोळ्याच्या विकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने उपचाराअभावी अंधत्वाचे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचे चित्र ग्रामीण क्षेत्रात विशेषत्वाने दिसते. या अनुषंगाने ग्रामीण क्षेत्रामध्ये नेत्र चिकित्सा, उपचार व चष्मे वाटप शिबिराच्या आयोजनाचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत ज्या नेत्र रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात आतापर्यंत अशा शिबिराच्या माध्यमातून हजारो नेत्र रुग्णांवर उपचार करण्यात आल्याने सामाजिक ऋणाची परतफेड केल्याचा आनंद होतो. यापुढेही अशा शिबिराच्या माध्यमातून नेत्ररुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ना. अहीर यांनी आपल्या मनोगताद्वारे सांगितले.