१७५ जणांचे बळी गेले; आणखी किती जाऊ द्यायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 05:00 AM2022-05-21T05:00:00+5:302022-05-21T05:00:41+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचे  बळी जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगाव यांनी गुरुवारी राकाँचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन समस्येकडे लक्ष वेधले. हल्ले रोखण्यासाठी उपाययोजनेची मागणी दहेगावकर यांनी केली. ऊर्जानगर कॉलनी व दुर्गापुरातील घटनांचीही माहिती दिली. दरम्यान, सर्व बाबींचा लवकरच आढावा घेणार असल्याची ग्वाही खासदार पवार यांनी दिली.

175 killed; How much more to let go? | १७५ जणांचे बळी गेले; आणखी किती जाऊ द्यायचे ?

१७५ जणांचे बळी गेले; आणखी किती जाऊ द्यायचे ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वाघ व अन्य वन्यप्राण्यांची संख्या वाढली. मात्र, हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी जाण्याच्या घटना वाढल्या. मागील सहा वर्षांत १७५ जणांचे बळी  गेल्याने आणखी जाऊ द्यायचे काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले. 
सन २०१४ मध्ये ताडोबा, प्रादेशिक आणि इतर जंगलात वाघ आणि इतर हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ९ जणांचा बळी गेला. २०१५ मध्ये ८, २०१६ मध्ये १७, २०१७ मध्ये १७, २०१८ मध्ये २७, २०१९ मध्ये २५, २०२० मध्ये ३३ आणि २०२१ मध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाघांमुळे १२२, तर इतर प्राण्यांमुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातच ३५ आणि प्रादेशिक वनक्षेत्रात १३२ जणांचा मृत्यू झाला होता. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी जाण्याचे दुष्टचक्र २०२२ मध्येही थांबू शकले नाही. किंबहुना ते वाढत असल्याचे दिसून येत आहे. २०१४ ते २०२१ कालावधीत १७५ जणांचे बळी गेले आहेत.  उन्हाळ्यात होणारा हा संघर्ष आता जून-जुलै महिन्यात घडू लागला आहे. 

वाघांचाही मृत्यू
२०१४ ते २०२१ सात वर्षात नैसर्गिक, अपघात व शिकार अशा घटनांमध्ये  ६४ वाघांचाही मृत्यू झाला. नैसर्गिक कारणामुळे ३८ वाघ, अपघातात ११ वाघ, आणि शिकारीत १५ वाघांचा मृत्यू झाला आहे. २०१९ आणि २०२०  या दोन वर्षांत शिकारीमुळे १० वाघांचा मृत्यू म्हणजे वाढत्या संघर्षाचाच परिपाक असू शकतो. 

खा. शरद पवारांचे वेधले लक्ष
- चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचे  बळी जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगाव यांनी गुरुवारी राकाँचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन समस्येकडे लक्ष वेधले. हल्ले रोखण्यासाठी उपाययोजनेची मागणी दहेगावकर यांनी केली. ऊर्जानगर कॉलनी व दुर्गापुरातील घटनांचीही माहिती दिली. दरम्यान, सर्व बाबींचा लवकरच आढावा घेणार असल्याची ग्वाही खासदार पवार यांनी दिली.

अहवालाची अंमलबजावणी कधी?
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी २६ जुलै २०२१ रोजी नागपूर येथील अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव यांनी चंद्रपूर  जिल्ह्यातील सर्व वनाधिकारी व तज्ज्ञांची बैठक घेऊन सूचना मागविल्या होत्या.  वाघ-बिवट-अस्वल, वन्यजीवांची संख्या, हल्ल्यात मानवी मृत्यू, शेतीचे नुकसान, जंगलतोड, मानवाचा हस्तक्षेप, वाघ, वन्यजीव व मानवाचे अस्तित्व यावर अहवालही तयार झाला. मात्र, मानवी बळी थांबले नाहीत.

 

Web Title: 175 killed; How much more to let go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.