१७५६ थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:33 PM2019-03-11T22:33:31+5:302019-03-11T22:33:50+5:30

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एक हजार ७५३ वीज ग्राहकांच्या घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर ६४२ ग्राहकांनी तत्काळ वीज बिलाचा भरणा केल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

1756 disrupted power supply of the arrears | १७५६ थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित

१७५६ थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरणची धडक मोहीम : १२ कोटी ५४ लाखांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एक हजार ७५३ वीज ग्राहकांच्या घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर ६४२ ग्राहकांनी तत्काळ वीज बिलाचा भरणा केल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीज बिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून वारंवार करण्यात येत आहे. वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना आॅनलाईन पेमेंट, मोबाईल अ‍ॅप, एनी टाईम पेमेंट मशीन्स यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्याप्रकारे लाभत असल्याचे चित्र आहे. परंतु अनेक थकबाकीदारांची थकबाकी साचवून ठेवण्याची सोय महावितरणची डोकेदुखी वाढविणारी आहे.
विकल्या गेलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वीज बिलाच्या माध्यमातून वसुली करून परत वीज विकत घेवून प्रामाणिक ग्राहकांना वीजपुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडताना थकबाकीदारामुळे महावितरणला अडचणीचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे १२ कोटी ५४ लाखांच्या घरात थकबाकी पोहोचली आहे तर वाणिज्यिक गाहकांकडे पाच कोटी ८५ लाख रुपये थकित आहे. औद्योगिक ग्राहकांकडे ६४ लाख थकबाकी आहे. चंद्रपूर व गडचिरोली ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना एक कोटी २६ लाख रुपये थकित आहेत.
महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. वीज ग्राहकांकडून वीज बिल विहित मुदतीत वसुल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांवरही कार्यवाही
वसुलीत निष्काळजीपणा बाळगणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाहीचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल एक हजार ७५६ ग्राहकांचा वीज पुरवठा वीज बिल न भरल्यामुळे खंडित केला आहे.

वीज पुरवठा खंडित होण्याची वेळ थकबाकीदारांनी आणू नये. त्यापूर्वीच थकबाकीदार ग्राहकांनी थकीत असलेले वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
-अरविंद भादीकर,
मुख्य अभियंता, महावितरण चंद्रपूर.

Web Title: 1756 disrupted power supply of the arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.