चंद्रपूरच्या पाणी समस्येवर मंत्रालयात १७ ला बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:08 AM2018-04-13T00:08:11+5:302018-04-13T00:08:11+5:30

शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १७ एप्रिल रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.

17th meeting of the Ministry of Water Supply on Chandrapur water issue | चंद्रपूरच्या पाणी समस्येवर मंत्रालयात १७ ला बैठक

चंद्रपूरच्या पाणी समस्येवर मंत्रालयात १७ ला बैठक

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची उपस्थिती : मुनगंटीवार यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १७ एप्रिल रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.
चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा होते. मात्र पाणी पुरवठ्यात उद्वलेल्या अडचणी दूर करत शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी बैठक आयोजित करून तोडगा काढण्याची विनंती ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यानुसार १७ एप्रिलला दुपारी १ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, महापालिका आयुक्त संजय काकडे, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आयोजित ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत ठोस उपाययोजना होणार आहेत.

Web Title: 17th meeting of the Ministry of Water Supply on Chandrapur water issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.