१९० चिन्हांचा पर्याय उमेदवारांना १९० चिन्हांचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:39+5:302020-12-26T04:23:39+5:30
निवडणूक आयोगाकडून नुकताच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला. यात नागभीड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ...
निवडणूक आयोगाकडून नुकताच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला. यात नागभीड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुका १५ जानेवारी २०२१ रोजी होत आहेत. नागभीड तालुक्यात या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नामांकन भरण्याच्या दिवसांपासून गावागावांमधील राजकीय हालचालींना चांगलीच गती आल्याचे दिसत असून निवडणूक लढवू इच्छिणारी मंडळी येथील तहसील कार्यालयात येऊन अधिकारीवर्गाकडून अटी व नियमांची माहिती करून घेत आहेत. त्याचबरोबर तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागातच लावलेल्या चिन्हांच्या यादीजवळ थांबून चिन्हांवर नजर फिरवत ''''हे'''' चिन्ह योग्य राहील, अशी आपसात चर्चा करीत असल्याचे चित्र तहसील कार्यालयात बघायला मिळत आहे.
निवडणुकीत चिन्हाला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक उमेदवार चांगले आणि आकर्षक चिन्ह मिळावा, यासाठी धडपड करीत असतो. अनेकांना यात यश मिळत असले तरी अनेकांच्या पदरी निराशाच पडते. कारण अगोदरच ते चिन्ह प्रतिस्पर्धी उमेदवारास मिळालेले असते.
बॉक्स
अशी आहेत चिन्ह
निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात कपाट, सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बँट, पुस्तक, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट, कंगवा, हिरा, कपबसी, फुटबाल, चष्मा, हॉकी, इस्त्री, जग, कीटली, चावी, लॅपटाॅप, लुडो, कढई, पेनड्राईव्ह, कैची, अननस,छत्री, पांगुळगाडा, टोपली, फलंदाज, विजेचे खांब, डिश अँटिना, ऊस, बासुरी, मिक्सर, पंचिंग मशीन, फ्रीज, शिवनयंत्र, स्कुटर, सोफा, स्टंट, बिगूल, तुतारी, टाईपरायटर, पाँकिट, अक्रोड, कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर,शिटी,सूप, चिमटा,नांगर आदी १९० चिन्हांचा यात समावेश आहे.