जिल्ह्यातील १९ हजार कोरोना योद्ध्यांना अद्यापही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:49+5:302021-05-15T04:26:49+5:30
शासनाने पूर्वी आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४५ वयोगटातील व्याधींसह असणाऱ्या नागरिकांचे लसीकरणाला ...
शासनाने पूर्वी आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४५ वयोगटातील व्याधींसह असणाऱ्या नागरिकांचे लसीकरणाला सुरुवात केली. परंतु, सुरुवातीपासून लसींचा तुटवडा जाणवत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांचे १७ हजारांचे टार्गेट ठेवण्यात आले. तर फ्रंटलाइन वर्करचे दहा हजारांचे टार्गेट होते. १९ हजार ८४४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला, तर १३ हजार २०० कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा म्हणजेच बुस्टर डोस घेतला. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांपैकी ६ हजार ६४४ जणांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. २२ हजार ६२१ फ्रंटलाइन वर्कर्सनी पहिला, तर ९ हजार ९२२ जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. मात्र येथीलसुद्धा साधारणत: १२ हजार ६९९ जणांना लसीची प्रतीक्षा आहे. मागणीच्या तुलनेत अत्यल्प साठा पाठविण्यात येत असल्याने लसीकरणामध्ये बाधा येत आहे.
बॉक्स
काहींनी पहिलाही डोस घेतला नाही
कोरोना काळात आरोग्य विभागात भरती करण्यात आली. त्यामुळे हेल्थ केअर वर्कर्सची संख्या कमी जास्त होत आहे. परंतु, अद्यापही काही आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाइन वर्कर्सनी पहिला डोसही घेतला नाही. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर बाधितांच्या संपर्कात येत असल्याने त्यांना त्वरित लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आहे.