१९२ कोटींच्या रस्त्याचा दर्जा निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:32 AM2021-09-24T04:32:50+5:302021-09-24T04:32:50+5:30

आवाळपूर : दळणवळणाच्या सोयीकरिता तालुक्यातील अनेक रस्ते मंजूर असून, काही रस्ताचे काम सुरू आहे तर काही पूर्ण झाले आहेत. ...

192 crore road degraded | १९२ कोटींच्या रस्त्याचा दर्जा निकृष्ट

१९२ कोटींच्या रस्त्याचा दर्जा निकृष्ट

Next

आवाळपूर : दळणवळणाच्या सोयीकरिता तालुक्यातील अनेक रस्ते मंजूर असून, काही रस्ताचे काम सुरू आहे तर काही पूर्ण झाले आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये मंजूर झालेला वनसडी - कवठाळा राजुरा तालुक्यातील पवनी हा १९२ कोटींच्या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, अल्पावधीतच रस्ता उखडल्याचे दिसून येत आहे.

वनसडी-कवठाळा रस्त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात असले तरी रस्त्याचा दर्जा मात्र सुमार आहे. इरई फाटा ते भोयगाव फाटा तीन ते चार किमी अंतर असलेल्या या अंतरावर मोठमोठे खड्डे पडले असून, चारचाकी व दुचाकीस्वारांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. अल्पावधीतच रस्ता उखडल्याने रस्ता बांधकामाबाबत रोष व्यक्त केल्या जात आहे. रस्ता बांधकाम करताना अंदाजपत्रकानुसार काम न झाल्याने व वापरण्यात आलेले खनिज, गिट्टी, डांबर, हे निकृष्ट दर्जाचे असल्याने हा रस्ता बांधकाम अल्पावधीतच उखडला असल्याचे बोलले जात आहे.

कोट-

दहा वर्षांचा करारनामा असल्याने रस्ता उखडला तरी संबंधित कंत्राटदारांकडून पुन्हा बांधकाम करण्यात येईल. -पाझारे, बांधकाम अभियंता, राजुरा.

कोट

रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. या रस्त्यावरील सर्व पुलांच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असून, अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार बांधकाम केलेले नाही. पालकमंत्र्यांनी या संपूर्ण रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत शासनाला निर्देश द्यावे

- अभय मुनोत, नांदा.

230921\img_20210913_172953.jpg

अल्पावधीतच उखडलेला रस्ता

Web Title: 192 crore road degraded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.