आधारभूत केंद्रावर लिलाव झालेला १९२८०.७६ क्विंटल धान गोदामात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:35+5:302021-03-04T04:52:35+5:30

मूल : आधारभूत केंद्रात धान किमतीसोबतच बोनससुद्धा मिळत असल्याने शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. आतापर्यंत १ हजार ३०६ शेतकऱ्यांनी ...

19280.76 quintals of paddy auctioned at Aadharbhut Kendra fell in the warehouse | आधारभूत केंद्रावर लिलाव झालेला १९२८०.७६ क्विंटल धान गोदामात पडून

आधारभूत केंद्रावर लिलाव झालेला १९२८०.७६ क्विंटल धान गोदामात पडून

Next

मूल : आधारभूत केंद्रात धान किमतीसोबतच बोनससुद्धा मिळत असल्याने शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. आतापर्यंत १ हजार ३०६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, तर २०० शेतकऱ्यांची ऑनलाईन व्हायची आहे. आतपर्यंत ५८८ शेतकऱ्यांचा २१३८०.७६ क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे. मात्र २ हजार १०० क्विंटल धानाचीच उचल करण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधारभूत केंद्रात १९,२८०.७६ क्विंटल धान पडून आहे. धान साठवणीसाठी बाजार समिती किरायाने गोदाम घेऊ शकते. त्याचे भाडे शासन देते. मात्र बाजार समिती पुढाकार घेत नसल्याचे दिसून येते. मार्च महिन्यापर्यंत धानाचा लिलाव झाल्यास घेतलेले पीक कर्ज फेडता येईल, ही आशा मावळेल की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

आधारभूत केंद्रात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यात येणाऱ्या धानाची किंमत १ हजार ८६८ रुपये असणार आहे. जवळपास शेतकऱ्यांना एका क्विंटल मागे २ हजार ५६८ रुपये मिळणार आहेत. मागील वर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती मूलमध्ये असलेल्या आधार केंद्रात ४५८ शेतकऱ्यांनी ५६ हजार ७४३.०३ क्विंटल धान विक्रीसाठी आणला होता. या वर्षी विक्रमी वाढ झाली आहे.

धानाची उचल करण्यासंदर्भात सूचना न आल्याने १९ हजार २८०.७६ क्किंटल धान आधारभूत केंद्रात पडून आहे. पुन्हा जवळपास ९०० शेतकऱ्यांच्या धानाचा लिलाव व्हायचा आहे. मात्र धान साठवणीसाठी बाजार समितीने उपायोजनाच केलेली नाही. ऑनलाइन नोदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना संदेशही दिला जात नसल्याची ओरड आहे.

कोट

धान भरडाईचा दर प्रती क्विंटल ४० रुपयांवरून १० रुपये झाल्याने संबंधित मिल मालक निरुत्साही आहेत. त्यातच धानाची प्रत योग्य नसल्याचे बोलल्या जात आहे. संबंधितांनी धान घ्यावा, असा प्रयत्न आहे. शासकीय गोदाम तांदळांनी भरले असल्याने उचल व्हायला वेळ लागत आहे. या संदर्भात जिल्ह्यधिकारी यांनी सूचना केल्या आहेत. आधारभूत केंद्राच्या यंत्रणेने किरायाने गोदाम घेतल्यास काहीसा प्रश्न सुटू शकतो. यासाठी शासनाच्या नियमानुसार भाडेसुद्धा मिळत असते. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घ्यायला हवा.

- अनिल गोगीरवार, जिल्हा पणन अधिकारी, महाराष्ट्र स्टेट को ऑप. फेडरेशन, चंद्रपूर.

Web Title: 19280.76 quintals of paddy auctioned at Aadharbhut Kendra fell in the warehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.