२ लाख ३७ हजार जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:54+5:302021-04-30T04:36:54+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात २९ एप्रिलपर्यंत दोन लाख ३७ हजार ४२५ जणांनी लस घेतली. ४५ पेक्षा जास्त वयाचे व सहव्याधी ...

2 lakh 37 thousand people were vaccinated | २ लाख ३७ हजार जणांनी घेतली लस

२ लाख ३७ हजार जणांनी घेतली लस

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात २९ एप्रिलपर्यंत दोन लाख ३७ हजार ४२५ जणांनी लस घेतली. ४५ पेक्षा जास्त वयाचे व सहव्याधी असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आरोग्य प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार डोस उपलब्ध मिळाले असते तर आतापर्यंत सुमारे चार लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. मात्र, आठवड्यातून दोन ते तीन दिवस सलग लसीकरण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी केंद्र बंद ठेवावे लागत आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी असलेल्या लसीचा पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने लसीकरण प्रक्रियेची गती मंदावली आहे. दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात सहा लाख ६७ हजार लसीची मागणी करण्यात आली. परंतु, २५ हजार लसीचाच पुरवठा करण्यात आला. गुरुवारी सायंकाळपर्यंत सर्वच केंद्रावरील लस संपली. त्यामुळे शुक्रवारी लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. जिल्ह्यात गुरुवारी १९५ पैकी ५५ केंद्रावर लसीकरण झाले. चंद्रपूर शहरातील १३ पैकी ५ केंद्रावर लसीकरण झालेे. यामध्ये ७ हजार ३२ जणांनी लस घेतली. चंद्रपुरातील १३ केंद्रांवर सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली होती. कर्मचारीच न आल्याने त्यांना परत जावे लागले.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ४५ वर्षांवरील सहव्याधी आणि ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १ एप्रिलपासून जिल्ह्यात सुमारे १९४ केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र, मोहिमेच्या पहिल्या दिवसापासूनच तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मागणीनुसार कधीच पुरवठा झाला नाही. दोन दिवस झाले की केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की येत आहे. मागील आठवड्यात सहा लाख ६७ हजार लसीची मागणी करण्यात आली. मात्र केवळ २५ हजार लसीचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे काही प्रमाणात प्रत्येक केंद्रावर लस पाठविण्यात आली. बुधवारी व गुरुवारी दोन दिवस बहुतांश केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत २४ हजार ३०० च्या जवळपास लस संपल्याने शुक्रवारपासून ज्या केंद्रावर लस शिल्लक आहे ते केंद्र वगळता इतर केंद्र बंद राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

बॉक्स

चिमूर तालुक्यातील केंद्र राहणार राहणार सुरू

चिमूर तालुक्यात दिलेल्या साठ्यापैकी काही साठा शिल्लक आहे. त्यामुळे ज्या केंद्रावर साठा शिल्लक आहे त्या केंद्रावर लसीकरण सुरू राहणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर सर्व केंद्रे बंद राहणार आहेत. अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतु, बूस्टर डोससाठी त्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे.

Web Title: 2 lakh 37 thousand people were vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.