जिल्ह्यात २ लाख ६६ हजार ४४६ जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:29 AM2021-05-08T04:29:48+5:302021-05-08T04:29:48+5:30

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आता सर्वांच्या नजरा लसीकरणाकडे आहेत. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २ लाख ६६ ...

2 lakh 66 thousand 446 people were vaccinated in the district | जिल्ह्यात २ लाख ६६ हजार ४४६ जणांनी घेतली लस

जिल्ह्यात २ लाख ६६ हजार ४४६ जणांनी घेतली लस

Next

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आता सर्वांच्या नजरा लसीकरणाकडे आहेत. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २ लाख ६६ हजार ४४६ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. यामध्ये ६३ हजार ७४५ नागरिकांनी दुसराही डोस पूर्ण केला आहे. १८ ते ४४ पर्यंतच्या ६ हजार ८९१ नागरिकांनी कोविशिल्ड तर २ हजार ६४७ नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. दरम्यान, चंद्रपूर महापालिका क्षेत्रात जिल्ह्यात सर्वाधिक ४९ हजार ७०९ जणांनी कोविशिल्डचा डोस घेतला आहे.

मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. मात्र, रुग्णसंख्या सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे आता प्रत्येक जण लसीकरण करून घेण्यासाठी वळले आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर महापालिका क्षेत्रात ४९ हजार ७०९ नागरिकांनी कोविशिल्ड तर ८ हजार १३८ जणांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लसीकरण झालेला तालुका भद्रावती ठरला असून या तालुक्यात २२ हजार ६४३ जणांनी लसीकरण पूर्ण केले आहे. तर सर्वात कमी जिवती तालुका असून ३ हजार २५६ जणांनीच लस घेतली आहे. या तालुक्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटामध्ये १६९ जणांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली आहे. तर ४५ वर्षांवरील १६८ नागरिकांनी दुसरा लसीचा डोसही पूर्ण केला आहे.

बाॅक्स

तालुकानिहाय लसीकरण

राजुरा १२७६०

वरोरा १७७१०

ब्रह्मपुरी २०७४५

भद्रावती२२६४३

चिमूर ११७२९

मूल १४९०७

सिंदेवाही१२४१०

चंद्रपूर ग्रामीण१९५४९

बल्लारपूर१६०२२

कोरपना १४७३०

सावली १२४६९

गोंडपिंपरी ७२७३

नागभीड १३८४४

जिवती३२५६

पोंभर्णा ८५५२

चंद्रपूर मनपा ४९७०९

एकूण २६६४४६

Web Title: 2 lakh 66 thousand 446 people were vaccinated in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.