२ हजार ४९८ शाळांना शासन आदेशाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:20 AM2021-06-25T04:20:56+5:302021-06-25T04:20:56+5:30
साईनाथ कुचनकार चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी शाळा सुरू झाल्या नाही. त्यातच यावर्षीही संकट आल्यामुळे अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत ...
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षी शाळा सुरू झाल्या नाही. त्यातच यावर्षीही संकट आल्यामुळे अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शासन निर्णय झाला नाही. असे असले तरी जिल्ह्यात २ हजार ४९८ शाळा विद्यादानासाठी सज्ज झाल्या असून, आता केवळ शासन आदेशाची प्रतीक्षा आहे.
दरवर्षी २७ जूनला शाळेचा पहिला ठाेका वाजतो. यावर्षी २७ ला रविवार असल्यामुळे २८ जूनपासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. कोरोना संकटामुळे मागील वर्षभर प्राथमिक शाळा सुरू झाल्या नाही. २७ जानेवारीपासून पाचवीपासून वर्ग भरले; मात्र तेही काही दिवसांत बंद करावे लागले. त्यामुळे पहिल्यांदाच परीक्षा न देताच सर्व विद्यार्थी वर्गोन्नत झाले. दरम्यान, नव्या शैक्षणिक सत्रातही कोरोनाचे संकट असल्यामुळे अद्यापतरी विद्यार्थी उपस्थिती संदर्भात शासन स्तरावर निर्णय झाला नाही. मात्र, वेळेवर घाई नको म्हणून जिल्ह्यातील शासकीय, तसेच खासगी शाळा व्यवस्थापनांनी शाळांची स्वच्छता करीत शाळांना सज्ज केले आहे.
बाॅक्स एकूण शाळा -२४९८
एकूण शिक्षक -१४००५
जिल्हा परिषद शाळा १५५७ शिक्षक-५४८५
महानगरपालिका- ५९ शिक्षक-१४०
समाजकल्याण विभाग ५६ शिक्षक-२९०
आदिवासी विभाग-६० शिक्षक-४८४
खासगी अनुदानित ३७५ शिक्षक-४४७४
खासगी विनाअनुदानित ३९१-३१३२
बाॅक्स
तालुकानिहाय शाळा
चंद्रपूर -३२०
भद्रावती-१८१
वरोरा-२३०
बल्लारपूर ११०
राजुरा २०३
गोंडपिपरी ११९
कोरपना १८२
मूल १२९
सिंदेवाही १३०
नागभीड १५३
ब्रह्मपुरी १६१
चिमूर-२२३
सावली १२१
पोंभूर्णा ७६
जिवती १६०
बाॅक्स
इंग्रजी शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू
कोरोना संकटामुळे शाळा सुरू झाल्या नसल्या तरी काही काॅन्व्हेेंटने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. मागील वर्षाप्रमाणेच विद्यार्थ्यांना टाईमटेबल ठरवून या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी करून घेतली जात आहे.
बाॅक्स
ग्रामीण भागात ऑनलाईनला विरोध
२८ पासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. दरम्यान, ऑनलाईन अभ्यासक्रमावरच भर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील पालक यासाठी तयार नसून आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच बोलावून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणीही केली जात आहे.
कोट -
२८ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. मात्र, विद्यार्थी उपस्थितीबाबत अद्याप शासनाने निर्णय घेतला नाही. सध्या कोरोना संकट कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल. जर विद्यार्थी उपस्थितीबाबत निर्णय न झाल्यास किमान स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना पुरवून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी करता येईल.
-जे. डी. पोटे
शिक्षण समिती सदस्य, चंद्रपूर
--