दहा दिवसांत 2 हजार 604 वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 05:00 AM2021-11-03T05:00:00+5:302021-11-03T05:00:34+5:30

जिल्ह्यात पाच हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक दिवशी सरासरी २६० प्रमाणे दहा दिवसांत २ हजार ६०४ बंधारे बांधण्यात आले. लोकसहभागातून ही मोहीम सुरू झाली आहे. यात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी नागरिक, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता पाहून प्रति बंधारा कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त २५ एकरांपर्यंत सिंचनाची सोय होऊ शकते. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून ४० ते ४५ हजार एकरवर सिंचन निर्मिती होण्यास मदत होईल.

2 thousand 604 forest dams in ten days | दहा दिवसांत 2 हजार 604 वनराई बंधारे

दहा दिवसांत 2 हजार 604 वनराई बंधारे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरिपासोबत रब्बी व उन्हाळी पिके घेण्याची सोय झाली तर उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यास मदत होईल, या हेतूने जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने यांच्या अभिनव संकल्पनेतून वनराई बंधाराची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत १० दिवसांत २ हजार ६०४ वनराई बंधारे बांधण्यात आले.
जिल्ह्यात पाच हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक दिवशी सरासरी २६० प्रमाणे दहा दिवसांत २ हजार ६०४ बंधारे बांधण्यात आले. लोकसहभागातून ही मोहीम सुरू झाली आहे. यात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी नागरिक, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता पाहून प्रति बंधारा कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त २५ एकरांपर्यंत सिंचनाची सोय होऊ शकते. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून ४० ते ४५ हजार एकरवर सिंचन निर्मिती होण्यास मदत होईल. जिल्ह्यात विहिरींची संख्या कमी व बोरवेलसाठी मर्यादा आहेत. ठिबक सिंचनाचा लाभ पुरेशा प्रमाणात देता येत नाही. त्यामुळे वनराई बंधाऱ्याचा पाण्याचा स्त्रोत असेल तर शेतकरी गटांना ठिबक सिंचनाचा लाभ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतला आहे.
असा बांधता येतो वनराई बंधारा  
१२ मीटर पर्यंतचा वनराई बंधारा बांधण्यासाठी ७०० ते ८०० रिकामी पोती, घमेली, पावडा व प्रवाहाच्या आजूबाजूच्या मातीची गरज असते. बांधकाम करताना भरलेल्या मातीच्या पिशव्या दोरीने शिवून तयार कराव्यात. जागेची निवड करताना ओढ्याची रुंदी कमी असावी. 

बंधारा बांधण्यापूर्वी प्रवाहावरील दगड व गाळ काढून स्वच्छ करावा. बंधाऱ्याच्या खालील मोकळ्या जागेतून पाणी वाहू नये. ०.६० मीटर रुंदीच्या पोत्याच्या दोन रांगा प्रथम तयार कराव्यात. त्यात ०.३० मीटरचा गॅप ठेवावा. काही उंचीपर्यंत पोत्याचे तीन थर तयार करावे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्यात आले आहे.
-भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

 

Web Title: 2 thousand 604 forest dams in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.