लोकसहभागातून वरूर रोड येथे २० बेडचा विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:28 AM2021-05-13T04:28:40+5:302021-05-13T04:28:40+5:30

यामुळे ग्रामीण जनतेला बराच आधार मिळणार आहे. सध्या कोरोना रुग्णांना उपचार करणे किंवा विलगीकरण कक्षात बेड उपलब्ध होत नसल्याने ...

20 bed separation room at Varur Road through public participation | लोकसहभागातून वरूर रोड येथे २० बेडचा विलगीकरण कक्ष

लोकसहभागातून वरूर रोड येथे २० बेडचा विलगीकरण कक्ष

Next

यामुळे ग्रामीण जनतेला बराच आधार मिळणार आहे.

सध्या कोरोना रुग्णांना उपचार करणे किंवा विलगीकरण कक्षात बेड उपलब्ध होत नसल्याने जीवितास धोका होत आहे. ही समस्या लक्षात घेत वरूर रोड येथील तलाठी विनोद गेडाम यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत चर्चा केली आणि ग्रामस्थांनी यास तयारी दर्शविली. तलाठी विनोद गेडाम यांच्या पुढाकारात आणि ग्रामस्थांच्या मदतीने २० बेडच्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यात शासनाच्या मदतीशिवाय रुग्णाची नाश्ता आणि जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रामदास पुसाम, सरपंच संगीता कोडापे, उपसरपंच रमेश काळे, तलाठी विनोद गेडाम, ग्रामसेवक मरापे, पोलीस पाटील बंडू भोंगळे, ग्रामपंचायत सदस्य आबाजी धानोरकर, राजू धानोरकर, सोलार कंपनीचे वसंतराव वरारकर, आशा वर्कर रंजना नगराळे, आरोग्य सेविका मरापे, गेडाम, ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: 20 bed separation room at Varur Road through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.